नवी दिल्ली, 29 मे : सध्याच्या कोरोना काळात एक शब्द सातत्याने ऐकायला मिळतो तो म्हणजे इम्युनिटी पॉवर (Immunity Power) म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती काही प्रमाणात कमी असते किंवा संसर्गानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर होत नाही असं अनेक संशोधनांमधून समोर आलेलं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या पध्दतींचा शोध सुरु होणं साहजिकच आहे.
सकारात्मक विचारांचा आरोग्याशी संबंध
अनेक अभ्यासांमधून असं स्पष्ट झालं आहे की जीवन (Life) आणि आपल्या आरोग्याविषयी (Health) सकारात्मक विचार (Positive Thinking) असलेल्या व्यक्तींची आजारांविरोधात लढण्याची क्षमता अधिक असते. ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये माणसाची वृत्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्या संबंधांबाबत एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात 15 ते 50 वर्षे वयोगटातील सुमारे 3000 लोकांचा समावेश करण्यात आला. या सहभागी व्यक्तींना तुम्ही तुमचं आरोग्य कोणत्या श्रेणीत ठेवता, असं विचारण्यात आलं. यासाठी 4 श्रेणी तयार करण्यात आल्या होत्या. त्यात खूप खराब ते खूप चांगले आरोग्य असे टप्पे होते.
वयात तीन पट फरक
यात ज्या व्यक्तींनी आपलं आरोग्य खराब आहे असं सांगितलं त्या तुलनेत ज्या लोकांनी आपलं आरोग्य चांगलं असं सांगितलं अशा व्यक्तींचा जिवंत राहण्याचा दर 3 पट जास्त होता. या संशोधनात अशाच लोकांना सहभागी करुन घेण्यात आलं ज्यांचे आरोग्य चांगलं होतं आणि त्यांना उच्च रक्तदाब, डायबेटीस किंवा कॅन्सरसारख्या कोणत्याही समस्या नव्हत्या. यानंतरही स्वतःला कमजोर समजणाऱ्यांचा मृत्यू दर जास्त नव्हता.
हे ही वाचा-Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल
धुम्रपानाप्रमाणेच वाईट परिणाम करते नकारात्मकता
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने याबाबत केलेलं संशोधन अधिक चांगल्या प्रकारे यावर प्रकाश टाकतं. या संशोधनात 65 वर्षं वयापेक्षा अधिक वयोगटातील 5000 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यात दिसून आलं की जे लोक स्वतःला कमकुवत समजत होते, त्यांचा मृत्यू 5 वर्षांच्या आता झाला. दुसरीकडे जे लोक स्वतःला मजबूत आणि सुदृढ समजत होते, ते अनेक आजार असूनही चांगलं जीवन जगत होते. आरोग्य आणि जीवनाविषयी नकारात्मक विचार हा वर्षात 50 पेक्षा अधिक सिगारेट पॅक (Cigarette) ओढण्याइतका तसेच हार्ट फेल होण्याइतका वाईट परिणाम करतो.
नकारात्मक विचारांमुळे शरीरात नेमकं काय होतं
आरोग्य किंवा जीवनाविषयी चुकीचे विचार केल्याने क्रॉनिक स्ट्रेस (Chronic Stress) निर्माण होतो. याचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो. यामुळे आनंद वाटण्यासाठी पूरक ठरणाऱ्या हार्मोन्सचा मेंदुतील स्त्राव घटतो. डोपामाईन (Dopamine) हा हॉर्मोन जसा कमी व्हायला लागतो तसा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
कोणत्या आजारांचा असतो धोका
तणाव, नकारात्मक विचारांचा थेट आणि वाईट परिणाम आपल्या डीएनएवर (DNA) होतो, असं वैज्ञानिकदृष्ट्या सिध्द झालं आहे. यामुळे डीएनएच्या शेवटच्या भागात आढळणारे टेलोमीटर लहान होतात. या कारणाने आपल्यामध्ये योग्य वयापूर्वीच केस पांढरे होणं, हाडं ठिसूळ होणं ही ज्येष्ठत्वाची लक्षणं दिसू लागतात. तसंच यामुळे हायपरटेन्शन, कार्डियोव्हॅस्क्युलर आजार, पचनक्रियेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. या आजारांचा पुन्हा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो आणि संबंधित व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला बळी पडू शकते.
हवेमार्फत पसरणाऱ्या आजारांचा धोका होतो कमी
सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींचे आयुर्मान वाढू शकते. अशी लोकं डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका कमी असतो. अशा लोकांना हवेमार्फत पसरणाऱ्या आजारांचा धोका कमी असतो, असे अनेक निष्कर्ष या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. सतत आनंदी आणि स्वतःला निरोगी मानणाऱ्या व्यक्तींवर सर्दी, खोकल्यासारख्या मौसमी (Seasonal) आजारांचादेखील फारसा परिणाम होताना दिसत नसल्याचं तुम्ही नक्कीच पाहिलं असेल.
सकारात्मकता कोणत्या गोष्टींमुळे वाढते
सकारात्मक विचारांचे फायदे आपण पाहिले. आता सकारात्मक विचारांसाठी कोणत्या गोष्टींची मदत घेता येते हे पाहूया. या सर्वात प्रथम गोष्ट आहे व्यायाम. आठवड्यात किमान 3 दिवस नियमित व्यायाम केल्यानं डोपामाईन हार्मोन्सचा स्त्राव येण्यास सुरुवात होते. या हार्मोन्समुळे आपण आनंदी राहू शकतो आणि आपले आरोग्य तंदुरुस्त राहते.
सकारात्मक विचारांसाठी डाएट देखील महत्वाचे
चांगला आहार घ्याल तर विचार चांगले राहतील. येथे चांगला याचा अर्थ स्वादिष्ट नाही तर पौष्टिक असा आहे. वय आणि कामाचा प्रकार यानुसार डाएट (Diet) असावं. आहारात प्रोटिन्स, कार्ब्ज, व्हिटॅमिन, मिनरल्स यांचे योग्य संतुलन असावे. यामुळे वाढते वजन आणि अन्य क्रॉनिक आजारदेखील दूर राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Immun, Positive thinking