Home /News /news /

पुन्हा वाद चिघळणार, साईबाबा जन्मस्थळावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आक्रमक भूमिका

पुन्हा वाद चिघळणार, साईबाबा जन्मस्थळावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आक्रमक भूमिका

'पाथरी हेच साई बाबा यांचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणून व्हावा.'

    मुंबई, 22 जानेवारी : साईबाबा जन्मस्थळावरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. कारण पाथरी हेच साई बाबा यांचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणून व्हावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी घेतली आहे. 'राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात पाथरीला जन्मस्थळ म्हणून निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या. राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पाथरीचा विकास साई जन्मस्थळच्या दृष्टीने व्हावा,' अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिर्डीचे ग्रामस्थ आक्रम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीतील ग्रामस्थांचं शिष्टमंडळ यांची मुंबईत बैठक झाली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी झाली आणि शिर्डीतील ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. पंढरपूर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, वडिलांचा खून करून मुलगा वारीला निघून गेला! आमचा वाद मिटला आहे आम्ही बंद मागे घेत आहोत, अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी घेतली. मात्र पाथरीला दिलेल्या जन्मस्थानाचा मुद्दा निकाली निघाला का? यावर मात्र शिर्डीकरांनी भाष्य केले नाही. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. काय आहे वाद? साईबाबांचा पाथरी गावात जन्म झाल्याचा दावा पाथरीकर करत आहेत. तर साईबाबांनी कधीही स्वतःचा धर्म, जात सांगितली नाही, जन्मस्थळ सांगितले नाही. त्यामुळे साईभक्त आणि सरकारची दिशाभूल पाथरीचे लोक करत असल्याचा आरोप शिर्डीकरांनी केला. त्यामुळे पाथरी विरुद्ध शिर्डीकर असा वाद सुरू झाला आहे. शिर्डी आणि पाथरी यांच्या वादावर अनेक चर्चा पुढे येताना पाहायला मिळत आहेत. साईबाबा नेमके कोण होते? त्यांचं जन्मस्थळ कोणतं होतं याबद्दल दावे-प्रतिदावे केले जात आहेत. 1975 रोजी ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. असा काही लोकांनी दावा करण्यात आला आहे. तर हा दावा खोटा असून बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् इथे झाला असल्याचा प्रतिदावा करण्यात आला आहे. एका तामीळ चरित्रात साईबाबांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा बाबांच्या जन्मस्थळाबद्दल दावे झाले. 1918 साली बाबांनी समाधी घेतल्यांचं सांगितलं जातं त्यावेळी त्यांच्या भक्तांनी शिर्डीत विश्वस्त मंडळ स्थापन केलं. त्यावेळी पाथरी गावातील कुणाची समावेश नव्हता. त्यांच्या सोहळ्यालाही गावातील कोणीच आलं नव्हतं. शिर्डी हेच साईबाबांचे सर्वकाही असल्याचे जगभरातील साईभक्त मानतात. त्यामुळे या दाव्यांना अर्थ राहिलेला नाही, असे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Saibaba, Shirdi sai mandir

    पुढील बातम्या