Home /News /maharashtra /

पंढरपूर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, वडिलांचा खून करून मुलगा वारीला निघून गेला!

पंढरपूर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, वडिलांचा खून करून मुलगा वारीला निघून गेला!

कृषी सहायक अंगद घुगे खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.

    पंढरपूर, 22 जानेवारी : माढा तालुक्यातील लऊळ हद्दीत झालेल्या कृषी सहाय्यक अंगद घुगे खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच याप्रकरणातील संशयित आरोपी असलेला मुलगा वडिलांचा खून केल्यानंतर मित्रांसोबत तीर्थक्षेत्राची वारी करण्यासाठी गेल्याची माहिती आहे. अंगद घुगे खूनप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी घुगे यांचा मुलगा विशाल याची दिवसभर कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचं कळतंय. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या खून प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे. मात्र वडिलांच्या हत्या प्रकरणात मुलगाच संशयित आरोपी म्हणून समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित मारेकऱ्यांनी या कामात वापरलेली पांढरी कार ( एम.एच12/ई एक्स 7778) पोलीस पथकाने रविवारी मध्यरात्री बार्शी येथून जप्त केली होती. बार्शीतून कार जप्त केल्यानंतर पोलीस पथकाने त्याची झडती घेतली. कारमध्ये सीटवर आणि आतील भागावर रक्ताचे डाग आढळून आले होते. पोलिसांनी याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले होते. लग्नात अक्षदा पडल्यानंतर वाहिला रक्ताचा पाट, भरमंडपात तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून कृषी सहाय्यक अंगद घुगे हे मंगळवारपासून बेपत्ता होते. कुटुंबातील लोकांनी बार्शी किंवा इतर पोलीस ठाण्यात 'मिसिंग' तक्रार का दाखल केली? या अंगानेही पोलीस कसून चौकशी केली. ती चौकशी करीत असताना बार्शीत संशयितरित्या कार आढळली. तपासादरम्यान खून प्रकरणात तीन ते पाच आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खुनानंतर मृतदेह लऊळ हद्दीत आणून निर्मनुष्य ठिकाणी माळरानावर जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. ‌या परिसरातील किंवा तालुक्यातील माहितगार आरोपी यामध्ये सामील असावा, हा धागा पकडून पोलीस तपास करत आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Crime, Pandharpur

    पुढील बातम्या