नाशिक, 11 एप्रिल : लॉकडाऊन दरम्यान 15 तासांपेक्षा जास्त ड्यूटी असतानाही शहरातील पोलिसांना आरोग्याबाबत काहीही चिंता नाही. कारण आहे त्यांची कॅप्टन आरती सिंह, ज्या स्वत: एक डॉक्टर देखील आहेत. त्या केवळ कायदा व सुव्यवस्थाच नाही तर त्यांच्या कार्यसंघाच्या आरोग्याची देखील काळजी घेत आहेत. संपूर्ण टीमला एसपी आरती यांनी स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, ‘जर रोगाची कोणतीही लक्षणे दिसली तर घाबरू नका, सगश्यात आधी मला कॉल करा’ प्रत्यक्षात डॉ. सिंह यांना 15-15 तास कर्तव्य बजावण्याविषयी अधिक काळजी आहे. मीटिंग्ज आणि वॉकी-टॉकीजमध्ये त्या सतत त्यांच्या आरोग्याबद्दल टीमला विचारत असतात. तसेच पोलीस कॉलनीत जाऊन महिला व मुलांशी संवाद साधतात. त्यांना सामाजिक अंतर दूर करणे, घराबाहेर पडू नये, कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचा आहार याविषयीही सल्ले दिले आहेत. कोरोनाने घेतला 200 हून अधिक लोकांचा बळी, वाचा काय आहे तुमच्या राज्यातली स्थिती एमबीबीएसनंतर 2004 मध्ये झाल्या आयपीएस अधिकारी डॉ. आरती यूपीच्या मिर्झापूरच्या आहेत. एमबीबीएसनंतर त्यांनी वाराणसीच्या सरकारी रुग्णालयातही काम केलं. दुसर्या प्रयत्नात, 2004 मध्ये यूपीएससी पास करत त्या आयपीएस झाल्या. राज्यात मृतांचा आकडा शंभरजवळ शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे मृतांचा आकडा शंभर पार झाला. राज्यात संक्रमणामुळे 110 मृत्यू झाले आहेत. राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 1574 आहे. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येत आहे. कोरोनाचे एक हजार रुग्ण आढळलेले मुंबई हे देशातील पहिले शहर बनले आहे. शुक्रवारी मुंबईत 132 नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी मुंबईत कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 1364 रुग्ण आढळले आहेत तर 97 लोकांचा बळी गेला आहे. हे खरं Social Distancing! शेजाऱ्यांसोबत सिनेमा पाहण्यासाठी वापरली भन्नाट आयडिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.