Breaking: देश पुन्हा हादरला! मंदिर परिसरात हत्या 2 साधूंची गळा दाबून हत्या

Breaking: देश पुन्हा हादरला! मंदिर परिसरात हत्या 2 साधूंची गळा दाबून हत्या

दोन्ही साधू शिवमंदिराची देखभाल करतात आणि पुजार्‍याचं काम करतात. त्यांच्याकडील चिमटा नेल्याची तक्रार साधूने केल्यावर काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केला.

  • Share this:

बुलंदशहर (उत्तर प्रदेश), 28 एप्रिल : पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि ड्रायव्हर हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात ढवळून निघालं असतानाच आता पुन्हा एकदा दोन साधूंची मंदिरातच हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये दोन साधूंची गळा दाबून हत्या करण्यात आली. साधूंकडील चिमटा नेल्याच्या तक्रारीमुळे काही व्यसनींनी खून केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. कंपाऊंड रूममध्ये दोघांचे मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत सापडले. दोन्ही साधू शिवमंदिराची देखभाल करतात आणि पुजार्‍याचं काम करतात. त्यांच्याकडील चिमटा नेल्याची तक्रार साधूने केल्यावर काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केला.

40 दिवस 19 पॉझिटिव्ह टेस्ट! अखेर तरुणानं कोरोनाला हरवून मिळवला डिस्चार्ज

घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुरारी असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताचय त्यांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले आहे. ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. साधूंच्या हत्येची बातमी वाऱ्यासाऱखी परिसरात पसरल्यामुळे घटनास्थळी पोलिसांची आणि लोकांची गर्दी जमा झाली आहे.

दरम्यान, पालघरमध्येही दोन साधू आणि चालकाची जमावाने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 101 लोकांना अटकही करण्यात आली आहे. पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज यांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेनं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे.

चाचण्या यशस्वी झाल्या तर 3 आठवड्यांत मिळणार कोरोनावर लस, पुणे SII दावा

First published: April 28, 2020, 9:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या