लॉकाडाऊनमध्ये अशी शिक्षा पहिल्यांदाच, घरातून बाहेर पडलात तर पोलीस ऐकवणार 'हे' गाणं

लॉकाडाऊनमध्ये अशी शिक्षा पहिल्यांदाच, घरातून बाहेर पडलात तर पोलीस ऐकवणार 'हे' गाणं

लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना रूममध्ये बंद करून गाणं ऐकवण्यात येईल असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.

  • Share this:

जयपूर, 12 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. याला रोखण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, सर्वच राज्यातील पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभा राहून लोकांना घरात बसण्याचं आवाहन करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं वारंवार सांगत आहेत. तरीही नागरिकांकडून लॉकडाऊनचं उल्लंघन केलं जात आहे. अनेक राज्यात पोलिसांनी नागरिकांना समजावण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली आहेत.

राजस्थानमध्ये जयपूर पोलिसांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना रूममध्ये बंद कऱण्यात येईल असं सांगितलं आणि त्यानंतर मसक्कली 2.0 हे गाणं ऐकवण्याची शिक्षा दिली जाईल असं म्हटलं आहे. दिल्ली 6 या चित्रपटातलं मसक्कली हे गाणं मोहित चौहानने गायलं होतं. या गाण्यात अभिषेक बच्चनसोबत सोनम कपूर होती. त्यानंतर या गाण्याचं 2.0 व्हर्जन नुकतंच आलं होतं. तनिष्क बागजीच्या या गाण्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

दिल्ली 6 चित्रपटातील गाण्याचं रिमेक व्हर्जन टी सीरीजनं रिलीज केलं आहे. मात्र हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं नाही. या गाण्यावर एआर रहमान आणि प्रसून जोशी हेसुद्धा फारसे खूश नाहीत. एआर रहमानने त्याच्या चाहत्यांना जुनं गाणं ऐकण्याचं आवाहन केलं होतं.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कोरोनामुळे अनेक भागात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मात्र तरीही लोक घरातून बाहेर पडत आहेत. लॉकाडाऊनचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर जयपूर पोलिसांनी लोकांना समजावण्यासाठी या गाण्याच्या काही ओळी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तसंच लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास शिक्षा केली जाईल असा इशाराही दिला आहे.

हे वाचा : भारतात कोरोनापासून वाचलेल्या पहिल्या व्यक्तीला कार्तिकने विचारले थेट प्रश्न

First published: April 13, 2020, 7:42 AM IST

ताज्या बातम्या