मुंबई, 25 मे : मागच्या काही दिवसांपासून मान्सूनची (monsoon) वाटचाल योग्य दिशेने सुरू होती परंतु हवामान बदलामुळे मान्सूनच्या वाटचालीत बदल झाला आहे. प्रतिकूल स्थितीमुळे र्नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकले आहेत. त्यामुळे हे वारे २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईत मान्सून (mumbai monsoon rain) 2 ते 5 जूनच्या दरम्यान येणार असल्याचे हवामान विभागाकडून (imd alert monsoon) सांगण्यात आले होते परंतु आता मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर काल मुंबईसह परिसरात मान्सून पूर्व (pre monsoon rain) पावसाच्या सरी बरसल्या परंतु मुंबईच्या वातावरणात दमटपणा असल्याने उष्णतेच्या (mumbai heat wave) प्रमाणात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले. (monsoon update)
राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील. बुधवारी (२५ मे) विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पेट्रोल-डिझेलनंतर आता खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय
कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे.
यामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे.
बंगालच्या उपसागरासह अंदमानला दाखल झालेला मान्सून गेल्या तीन दिवसांपासून अनुकूल स्थितीच्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. दरम्यान, कोल्हापूर, कोकणसह राज्यातील काही भागांत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यांत पाऊस
कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
गुरुवारी (२६ मे) विदर्भातील गोंदिया जिल्हा सोडून उर्वरित सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारी (२७ मे) विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Mumbai rain, Rain, Rain fall, Weather update