अजित मांढरे, प्रतिनिधी
मुंबई, 21 जून : महाराष्ट्र सरकारच्या राईट टू इन्फॉर्मेशन अर्थात 'RTE' अंतर्गत सर्व खाजगी शाळेत प्रेवश मिळाला. मात्र, शासकीय नियमानुसार प्रवेशित मुलांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मोफत देणं शाळेवर बंधनकारक असतानाही ते न दिल्याने रिक्षा चालक पालकाने आपल्या पाल्याला थेट अर्धनग्न अवस्थेत शाळेत नेलं. या सगळ्या प्रकारामुळे ठाणे जिल्हा शिक्षण विभाग, कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभाग आणि शाळांचे धाबे दणाले आहेत.
शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले. मात्र, शाळेकडून मिळणारा शाळेचा गणवेश न दिल्यामुळे एका विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याला अर्धनग्न अवस्थेत शाळेत नेलं. मयुर
असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. खरंतर या प्रकारामुळे पालकांनी शाळेला आणि केडीएमसीच्या शिक्षण विभागाला नग्न केलं असंच म्हणावं लागेल. आपला हक्क मिळवण्यासाठी मयुरच्या या गांधीगिरीमुळे शिक्षण विभागाचे बाभडे निघालेत.
मयुरचे वडील मनोज वाघमारे रिक्षा चालक आहेत. पण मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवायची आपली अैपत नाही हे ओळखून त्यांनी RET म्हणजेच राईट टू एज्युकेशनमधून मयुरचा फॉर्म भरला आणि घरा जवळच कल्याण पुर्वेतील लोकग्रीम येथील आनंद ग्लोबल शाळेत घातलं. हा आनंद गगनात मावत नव्हता तोच RTE मध्ये मिळणारा शाळेचा गणवेश आणि पुस्तके देण्यास शाळेनं नकार दिला आणि त्यांच्या सर्व आनंदावर शाळेनं विरजन टाकलं.
या विषयी आम्ही शाळेला जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीला नाक मुरडलं. पण मीडियात बातमी येईल हे कळताच त्यांनी हे सर्व गैरसमजातून झालं आणि शिवाय गेली 3 वर्षे शासनाने आम्हाला RTE मधील विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी दिली नाहीये हे गाराहणं देखील गायलं.
RTE विद्यार्थ्यांची फी शासन देत नाही हे सांगून शाळेनं कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शिक्षण विभागावर खापर फोडलं आणि हात वर केले. मात्र, आम्ही केडीएमसी शिक्षण अधिकारी जे.जे जडवी यांना याबाबत विचारले असता त्यांनी जिल्हा परीषदेत शिक्षण विभागाकडे बोट दाखवलं.
हे अशाच प्रकारे शाळा आणि सरकारी विभाग एकमेकांकडे बोट दाखवतात आणि वेळ मारुन नेतात. खरंतर गरज आहे RTE मधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे आणि पुस्तकांचे पैसे गेले कुठे याची चौकशी करण्याची. ही चौकशी झाली तरच गरीब मुलांचा शिक्षणाचा हक्क मारणारे हे शाळेकरी आणि सरकारी अधिकारी यांचा भ्रष्टाचार बाहेर येईल आणि गरीब मुलांना त्यांचा हक्क मिळेल.
वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेतानाच अभिजीत बिचुकलेचा EXCLUSIVE VIDEO