रत्नागिरी, स्वप्निल घाग, प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुट्ट्या शाळांना पडली आहे. त्यामुळे आता गावी जाण्याचे वेध लागले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या मार्गाने प्रवास करण्याआधी तुम्ही ही बातमी वाचायला हवी. आजपासून परशुराम घाट कामानिमित्त बंद राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट आजपासून दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीस राहणार बंद राहील.
IRCTC: ट्रेनचं पूर्ण कोच कसं बुक करायचं? ही आहे सोपी प्रोसेसघाटातील कातळ भागाचे ब्लास्टिन करून पावसाळ्याची मार्ग वाहतुकीस मोकळा करण्यासाठी ठेकेदाराने घाट बंद करण्याची केली होती मागणी. जिल्हा प्रशासनाने घाटातील कामासाठी पंधरा दिवसांसाठी घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद केल्याने वाहतूक वळवली आहे. पुढील पंधरा दिवस मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. मुंबईतून येणारी वाहतूक लोटे मार्गे आंबडस मधून तर गोव्यातून येणारी वाहतूक कळंबस्ते मार्गे आंबडसकडून लोटेदरम्यान वळवण्यात आली आहे.
विमानाने Takeoff केलं आणि इंजिनला लागली आग, 169 प्रवाशांनी रोखला श्वासघाटातील काम आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमन्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता.