मुंबई, 27 ऑगस्ट : मुंबई आणि उपनगरात ड्रग्स विक्रीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तळोजा पोलिसांनी (दि.27) रात्री 2 वाजता एका नायजेरीयन व्यक्तीला तळोजा फेज 1 येथून एमडी मेफेड्रॉन अमली पदार्थासह ताब्यात घेतले. (Mumbai Drugs Case) एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना असा कुणी व्यक्ती ड्रग्स विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून तात्काळ पोलिसांनी दोन पथक तयार केले आणि घटना स्थळी जाऊन पाहारा देत धूम स्टाईलने गुन्हेगाराला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरात ड्रग्स विक्रीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तळोजा पोलिसांनी (दि.27) रात्री 2 वाजता एका नायजेरीयन व्यक्तीला तळोजा फेज 1 येथून एमडी मेफेड्रॉन अमली पदार्थासह ताब्यात घेतले. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना असा कुणी व्यक्ती ड्रग्स विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून तात्काळ पोलिसांनी दोन पथक तयार केले आणि घटना स्थळी जाऊन पाहारा देत धूम स्टाईलने गुन्हेगाराला ताब्यात घेतले. तीन तासांनी एक संशयित नायजेरियन व्यक्ती दिलसा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या लक्षात येताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धूम स्टाईलने पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : Akola Crime : धक्कादायक! पोलिसांनी केस दाबण्यासाठी 1 लाख रुपये मागितल्याचा व्हिडीओ करत दोघांची आत्महत्या
पोलिसांनी झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे 58 ग्राम ड्रग्स सापडले ज्याची किंमत 9 लाख रुपये होती. मागील बऱ्याच महिन्यापासून हा तळोजा परिसरात ड्रग्स विक्रीसाठी घेवून येत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. तळोजा परिसरात अनेक जण अशा नशेच्या आहारी गेले असून, ड्रग्सचे सेवन सर्रास होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ड्रग्स पेडलर मोठ्या प्रमाणात येत असतात. नवी मुंबईत तळोजा हे परिसर ड्रग्सचे हब बनले असल्याचे दिसून येते.
मागेच दोन दिवसापूर्वी ड्रग्स विक्रीसाठी पंजाब मधून आलेल्या दोन जणांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले होते,त्यांच्या कडून 12 ग्राम ड्रग्स जप्त करण्यात आले होते,तर चौकशीत आणखी काही ड्रग्स पेडलर वावरत असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा पासून तळोजा नवी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
हे ही वाचा : नियतीचा खेळ! वडिलांचं पार्थिव घेऊन जाताना मुलाच्या गाडीला भीषण अपघात
सदर नायजेरियन इसमास ताब्यात घेऊन 232/2022 NDPS Act 8 क, 21 क प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, अँनथोनी नैईमेका ओकोली वय-36 वर्षं, धंदा- कपडे विक्री, रा- सेक्टर 36 खारघर, मुळ रा - ओनिस्था,नायजेरिया.येथील रहिवाशी असल्याचे समोर आले. आरोपीला 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून,पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत.