मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /विहिरीचा भाग कोसळला, धुळ्यात 36 वर्षीय आईसह 10 वर्षाच्या मुलाने गमावले प्राण

विहिरीचा भाग कोसळला, धुळ्यात 36 वर्षीय आईसह 10 वर्षाच्या मुलाने गमावले प्राण

धुळे जिल्ह्यातून एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. (Dhule News) विहिरीचा भाग कोसळून दोघे आई आणि मुलगा या दोघांचा मृत्यू झाला आहे. (Mother Son Died) धुळे जिल्ह्यातील मोरशेवडी येथे ही घटना घडली.

धुळे जिल्ह्यातून एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. (Dhule News) विहिरीचा भाग कोसळून दोघे आई आणि मुलगा या दोघांचा मृत्यू झाला आहे. (Mother Son Died) धुळे जिल्ह्यातील मोरशेवडी येथे ही घटना घडली.

धुळे जिल्ह्यातून एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. (Dhule News) विहिरीचा भाग कोसळून दोघे आई आणि मुलगा या दोघांचा मृत्यू झाला आहे. (Mother Son Died) धुळे जिल्ह्यातील मोरशेवडी येथे ही घटना घडली.

धुळे, 14 मे : धुळे जिल्ह्यातून एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. (Dhule News) विहिरीचा भाग कोसळून दोघे आई आणि मुलगा या दोघांचा मृत्यू झाला आहे. (Mother Son Died) धुळे जिल्ह्यातील मोरशेवडी येथे ही घटना घडली. शेतातील विहीर बघण्यासाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. सुनीता पवार (वय 36)आणि शाम पवार (वय 10), असे मृत मायलेकांची नावं आहेत. तर या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले -

मृत महिला आणि मुलगा हे नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. ते नुकतेच मोरशेवडी येथे नातेवाईकांकडे आले होते. धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे शेतात विहीर बघण्यासाठी हे दोघे मायलेक गेले होते. त्यावेळी विहिरीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अडकले गेले आणि त्यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुनीता पवार, वय 36 आणि शाम पवार, वय 10 असे मृत झालेल्या मायलेकांची नावं आहेत.

दरम्यान, बीडमध्ये विहिरीत बुडून वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच आता हृदय हेलावून टाकणारी घटना धुळ्यात घडली आहे. 36 वर्षीय महिला आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश असा मायलेकाचा विहिरीचा भाग कोसळल्याने या दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

दिलीप खीरा जाधव यांच्या विहिरीचे काम शेतात चालू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दोघाही मृत मायलेकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी दुपारी उशिरापर्यंत काम सुरु होते. ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा - Pune: मोठी दुर्घटना टळली, सिंहगडावर जाणारी बस दरीत कोसळली असती, थरारक VIDEO आला समोर

बीडमधील घटना ताजीच...

बीड जिल्ह्यातील परळी येथील (Parli Beed) बरकतनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडील आणि मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वडील विहिरीवर पाणी आणायला गेले असता ते विहिरीत पडले आणि बुडाले. त्यावेळी तिथे उपस्थित मुलगाही त्यांनी वाचवताना बुडाला. (Father and Son Drowned) यानंतर दुसऱ्या मुलाने या दोघांना वाचवण्यासाठी उडी घेतली असताना तोही बुडत होता. यादरम्यान त्याच्या आईने दोरी फेकून वाचवले.

शेख सादिक शेख हमीद असे मृत वडिलांचे (वय 58) तर शेख रफिक शेख सादीक (वय 25) असे मुलाचे नाव आहे. ही घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Death, Dhule, Mother, Son