जगातलं सर्वांत महागडं घर विक्रीला काढलं आहे. सुंदर लोकेशन आणि आलिशान महालासारख्या सुविधा यांचं हे घर आहे अमेरिकेत.
कॅलिफोर्नियाच्या सुंदर डोंगरांमध्ये बांधलेल्या या घराचे नाव 'द वन' आहे. हे घर सुमारे 10 हजार चौरस फुटांमध्ये बांधलेलं आहे. घरात राहणाऱ्यांना प्रसिद्ध हॉलीवूड स्टार्स आणि जगातील काही मोजक्या श्रीमंत लोकांचे शेजारी व्हायची संधी मिळणार आहे.
वास्तविक या घराच्या मालकावर 2 अब्ज 24 कोटी रुपये कर्ज आहे. ज्यासाठी तो त्याच्या अपेक्षित किमतीपेक्षा कमी किंमतीत घर विकण्यास तयार आहे. त्यामुळे आता हे सर्वात महागडं घर विकलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घराचं इंटिरिअर (Nile Niami) नील नियामी यांनी केलं आहे. 7 वर्षं खर्चून हे डिझाइन आकाराला आलं आणि त्याचे फोटो पहिल्यांदाच जगापुढे आले आहेत.
याअगोदर सौदी राजपुत्राने घेतलेलं एक फ्रेंच रिसॉर्ट 22 अब्ज 25 कोटी रुपयांसह सर्वाधिक महागडं घर ठरलं होतं. अब्जाधीश केन ग्रिफिनने मॅनहॅटनमध्ये अमेरिकेतलं सर्वात महागडं पेंटहाऊस 23.8 लाख डॉलरना विकत घेतलं होतं. आता The One कितीला विकलं जाणार आणि कोण घेणार याची उत्सुकता आहे.
या घरामध्ये सर्व आवश्यक सुखसोयीबरोबर आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. त्यामुळे हे घर आणखी सुंदर दिसत आहे.