Pfizer नंतर आता Moderna औषधी कंपनीवरही सायबर हल्ला; गोपनीय माहिती गेली चोरीला

Cyber attack on Corona Vaccine: अमेरिकेच्या मॉडर्ना (Moderna Vaccine) औषधी कंपनीवर सायबर हल्ला झाला असून लशीसंबंधित महत्त्वाचा डेटा चोरी झाली आहेत.

Cyber attack on Corona Vaccine: अमेरिकेच्या मॉडर्ना (Moderna Vaccine) औषधी कंपनीवर सायबर हल्ला झाला असून लशीसंबंधित महत्त्वाचा डेटा चोरी झाली आहेत.

  • Share this:
    लंडन, 15 डिसेंबर: जर्मन कंपनी बायोएनटेक (BioNtech) आणि अमेरिकन औषधनिर्मित कंपनी फाइझरच्या (Pfizer) डेटा सेंटरवर सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्यानंतर आता मॉडर्ना लशीसंबंधीत (Moderna vaccine) माहितीची चोरी (Data Hack) करण्यासाठी कंपनीच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यात लस संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रेही चोरी झाल्याचं मॉडर्ना कंपनीनं सांगितलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सायबर हल्ल्याची माहिती स्वतः कंपनीलाही नव्हती. युरोपियन मेडिसीन एजन्सीने (EMA) कंपनीला सर्वप्रथम याबाबत माहिती दिली. गार्डीयनने दिलेल्या बातमीनुसार, कंपनीने जेव्हा लसीकरणाच्या मंजुरीसाठी ही कागदपत्रे  सरकारकडे पाठवली होती, त्यादरम्यान ही लशीसंबंधित माहिती चोरी झाली आहे. EMA ही औषध निर्मितीच्या बाबतीत युरोपियन देशांची नियामक एजन्सी आहे. जी युरोपियन देशांमधील लसींना मान्यता देते. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा डेटा चोरण्यासाठी सायबर हल्ला होऊ शकतो, असा इशारा काही महिन्यांपूर्वीच दिला गेला होता. फायइर आणि बायोएनटेक कंपनीवरही सायबर हल्ला झाला होता. Pfizer-BioNTech वरही झाला होता सायबर हल्ला यापूर्वी फायझर बायोएनटेकवर केलेल्या सायबर हल्ल्यात कोरोना विषाणूच्या लशीसंबंधित फाइल्स बेकायदेशीरपणे चोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सायबर अटॅक दरम्यान हॅकर्सनी लस संबंधित फाइल्सचा अॅक्सेस मिळवला होता. या कंपन्यांनीही युरोपीयन युनियनच्या मेडिसिन रेग्युलेटर (EMA) कडे कोरोना विषाणूची लस वापरण्याच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी फायझरने एक निवेदन जारी करून असं म्हटलं होत की, फायझर आणि बायोएनटेक कंपनीची कोरोना लस, बीएनटी 162 बी 2 शी संबंधित काही कागदपत्रे EMA सर्व्हरवर ठेवली होती. या सर्व्हरवर सायबर हल्ला होऊन माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. पण या हल्ल्यात बायएनटेक किंवा फायझरशी संबंधित कोणतीही माहिती चोरी झाली नव्हती.
    Published by:News18 Desk
    First published: