मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ग्राहकांना मोठा दणका! 3 बँकांनी वाढवलं व्याजदर, पाहा तुमच्यावर किती वाढणार EMI चा बोजा

ग्राहकांना मोठा दणका! 3 बँकांनी वाढवलं व्याजदर, पाहा तुमच्यावर किती वाढणार EMI चा बोजा

तुम्हाला जास्तीचा EMI आणि कर्ज घेणार असाल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागणार आहे.

तुम्हाला जास्तीचा EMI आणि कर्ज घेणार असाल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागणार आहे.

तुम्हाला जास्तीचा EMI आणि कर्ज घेणार असाल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: तुम्ही जर कर्ज घेतलं असेल किंवा लोनवर काही गोष्टी घेतल्या असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तीन बँकांनी आपल्या MCLR मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कर्ज आणि EMI चा बोजा वाढला आहे. तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला जास्तीचा EMI आणि कर्ज घेणार असाल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागणार आहे.

बँकांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लँडिंग रेट म्हणजे MCLR मध्ये वाढ केली आहे. फेडरल बँकने 0.20 टक्के तर कोटक महिंद्रा बँकने 0.10 ते 0.30 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे नवे दर आता 16 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

SBI ने वाढवला EMI

स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा MCLR मध्ये वाढ केली आहे. या बँकेनं 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्यामध्ये ऑटो आणि होम लोन महाग केलं आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 15 जानेवारीपासून एक वर्षासाठी 8.30 ते 8.4 टक्क्यांनी व्याजदर वाढवलं आहे. याचा परिणाम म्हणून EMI मध्ये देखील वाढ होणार आहे.

Home Loan : 30 लाखांच्या लोनवर 1 टक्के व्याज वाढलं तुमच्या EMI किती वाढतो पाहा

एसबीआयसह इतर बँकाही कर्जाचे दर वाढवत आहेत. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 225 बेसिसवरून 6.25 टक्क्यांवर गेला आहे. फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा RBI रेपो रेट वाढवणार की काय याची चिंता आहे.

जागतिक बाजारपेठेत मंदीचे संकेत आहेत. एकीकडे मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. त्यात US फेड आपल्या व्याजदरात वाढ करत असल्याने त्याचा परिणाम जगातील बँकांवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

होम लोनची परतफेड करताना कोणता पर्याय ठरेल फायद्याचा? जाणून घ्या

पहिली वाढ मे मध्ये 0.40 % आणि नंतर जूनमध्ये 0.50 % होती. आरबीआयने ऑगस्टमध्ये पुन्हा रेपो दरात 0.50 टक्के आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये 0.50 टक्के वाढ केली होती. डिसेंबरमध्ये आणखी 0.35 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर एकूण वाढ 225 बीपीएस झाली आहे.

First published:

Tags: EMI, Home Loan, Money