मुंबई : प्रत्येकाचं स्वप्न असतं की घर खरेदी करायचं. यासाठी बँकांकडून आता होम लोन सुद्धा सहज उपलब्ध असतं. या कर्जाचे हफ्ते अनेक वर्षे मुदतीत परतफेड करायचे असतात. त्यामुळे जर व्याज दरात थोडासा जरी बदल झाला तरी कर्जदारांना लाखो रुपये जास्तीचे द्यावे लागतात. त्यामुळे होम लोन लवकरात लवकर फेडलं पाहिजे. यातून लाखो रुपये वाचू शकतात. बँका जेव्हा व्याजदर वाढवतात तेव्हा त्यासाठी होमलोन प्रीपेमेंट हा एक चांगला पर्याय आहे. आर्थिक सल्लागार किंवा तज्ज्ञ नेहमीच सांगतात की होम लोनचे प्रीपेमेंट केल्यानं लाखो रुपयांची बचत होते. जर व्याजात १ टक्के वाढ झाली तरी ३० लाखांच्या कर्जावर तुम्हाला ४.५ लाख रुपये जास्त भरावे लागतात. एप्रिलनंतर रेपो रेटमध्ये २.२५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे होम लोन ६.७० टक्क्यांवरून थेट ८.६५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. यात जवळपास १.९५ टक्के वाढ झालीय.
2023च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांना मिळू शकतो दिलासा? जाणून घ्या सविस्तर माहितीक्रेसेंड वेल्थचे संस्थापक कीर्तन ए शाह यांनी म्हटलं की, एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.२५ टक्के वाढ केली आहे. यामुळे सर्व प्रकारची कर्जे महाग झाली. एप्रिल २०२० मध्ये होम लोन सरासरी ६.७० टक्के होतं ते आता ८.६५ टक्क्यांवर गेलं आहे. तुमच्या कर्जावर बँकेचं व्याज वाढतं तेव्हा याचा परिणाम दोन पद्धतीने होऊ शकतो. जर होम लोनचा कालावधी निश्चित असेल तर हफ्त्याची रक्कम वाढते आणि हफ्त्याची रक्कम निश्चित असेल तर कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवली जाते. उदाहरणादाखल पाहू. समजा ३० लाख रुपयांचं गृहकर्ज २० वर्षांसाठी घेतलं आहे. एप्रिल २०२२ पर्यंत व्याजदर हा ६.७ टक्के होता. त्यानुसार २० वर्षात एकूण ५४ लाख ५३ हजार रुपये परतफेड करावी लागेल. यात व्याज असेल २४.५३ लाख. दर महिन्याला हफ्ता २२ हजार ७२२ रुपये इतका येईल. जर या कर्जाचा कालावधी १५ वर्षे केला तर व्याज कमी होऊन ते २३ लाख ६५ हजार इतके आणि एकूण ५३ लाख ६५ हजार रुपये परतफेड करावे लागतील. तेव्हा दर महिन्याला येणारा हफ्ता २९ हजार ८०७ रुपये असेल. म्हणजेच कमी मुदतीत कर्ज फेडल्याने १ लाख रुपये कमी द्यावे लागतील.
तुम्हाला मिळू शकतं का एक टक्के व्याजाने कर्ज, नेमकं कसं ओळखायचं?व्याजदर वाढल्याने होम लोलोनचा दर वाढून समजा ७.७ टक्के झाला तर महिन्याचा हफ्ता वाढेल आणि तो २४ हजार ५३४ रुपये इतका होईल. एकूण परतफेड करण्याची रक्कम त्यामुळे ५८ लाख ८८ हजार इतकी असेल. म्हणजेच व्याजाची रक्कम वाढून ती २८.८८ लाख रुपये झाली. याचाच अर्थ जर ३० लाख रुपयांच्या कर्जावर व्याजदरात एक टक्के जरी वाढ झाली तरी व्याज जवळपास साडेचार लाख रुपये जास्त द्यावं लागतं.
सध्या व्याजदर हा ८.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या व्याजदरानुसार ३० लाखाचे होम लोन २० वर्षात परतफेड केल्यास एकूण ६३.१६ लाख रुपये भरावे लागतील. एप्रिल २०२२ च्या तुलनेत ३० लाखांच्या कर्जावर व्याज म्हणून ८.६३ लाख रुपये जास्त द्यावे लागती.