भवनेश्वर, 18 जून : नवीन कपडे खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (minor boy in Odishas allegedly killed his mother for not giving him money to purchase news clothes) शुक्रवारी पोलिसांनी या धक्कादायक वृत्ताचा खुलासा केला. ओरिसामधील (Odisha News) एका उपरबारडा गावात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्धवट शिक्षण सोडलेला 10 वर्षीय अल्पवयीन तरुण आईकडून नवे कपडे खरेदी करण्यासाठी 500 रुपये मागत होता. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. यानंतरही मुलगा वारंवार आईकडे पैशांची मागणी करीत होता. शेवटी रागाच्या भरात त्याने आईवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. कुऱ्हाडीच्या एका हल्ल्यातच आईचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही मुलाने आईच्या मृतदेहाचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. मुलगा गेल्यावर्षी इयत्ता पाचवीत शिकत होता. मात्र तेव्हापासून त्याने शाळेत जाणं बंद केलं होतं. त्याच्या वडिलांच पाच वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. मुलाला Juvenile Justice Board च्या समोर हजर केलं जाईल. सध्या या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील आईच्या हत्येचं प्रकरण उत्तर प्रदेशातील एका एका अल्पवयीन मुलानं त्याच्या आईची हत्या (Murder) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या या मुलाची बाल सुधारगृहाच्या पथकाकडून (Squad of Juvenile Correctional Institution) चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख आला असून, त्याच्यामुळे या हत्याकांडाची रूपरेषा तयार केली गेल्याचं चौकशीमधून समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.