मिका सिंग सध्या स्वतःचं स्वयंवर करणार असून त्याच्या या बायको शोधण्याच्या घोषणेमुळे तो बराच चर्चेत आला आहे. मिका लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असला तरी मिका भूतकाळात अनेक प्रकरणांमध्ये अडकला होता.
मिकाची सगळ्यात मोठी कॉंट्रोव्हर्सी होती त्याने राखी सावंत सोबत घातलेला गोंधळ. मिकाने स्वतःच्या बर्थडे पार्टीला राखीला बोलवलं होतं आणि तिथे त्याने तिला जबरदस्ती किस करायचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर राखीने रीतसर तक्रार दाखल करून मिकाला जेलची हवा खायला भाग पाडलं होतं.
मिकाने मागे एकदा बिपाशा बासूसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात मिकाच्या गालावर एक मोठासा लिपस्टिक मार्क दिसत आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो नंतर त्यानं असं संगितलं होतं की बिपाशाने त्याला किस केल्याने हा लिपस्टिक मार्क आला आहे. मात्र बिपाशाने याला नकार देत शो मधील अली असगरच्या पात्राने त्याला किस केल्याचं स्पष्ट केलं होतं. मिकाला लग्न तर करायचं आहे पण त्याची नाव इतर महिलांशी जोडली जाण्याचा सिलसिला बंद होणार का हा प्रश्न महत्तवाचा आहे.
मिका आणि त्याचे बंधू दलेर मेहंदी यांचं नाव ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी आलं होतं. त्यावर पैसे उकळल्याबद्दल आरोप करण्यात आले होते मात्र त्याने सगळे आरोप फेटाळून लावले होते.
हिट अँड रन केसमध्ये गुंतवणूक असं आता बॉलिवूडची नवं नाही. फक्त सलमान खाणच नव्हे तर मिका सिंगच नाव सुद्धा हिट अँड रन केसमध्ये आलं होतं. त्याने एका रिक्षा चालकाला गाडीने उडवलं आणि रिक्षेत बसलेल्या पॅसेंजरला इजा पोहोचली होती असा आरॊप त्यावर केला गेला आहे.
मिकाने भर लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये एका डॉक्टरला जोरात थोबाडीत मारल्याचा किस्सा सुद्धा प्रसिद्ध आहे. यातून मिकाला असणारे angar issue सुद्धा समोर येतात.
मिकाला परदेशी चलन परवानगी क्षेत्राच्या बाहेर बाळगल्याबद्दल सुद्धा त्याला मुंबई एअरपोर्टवर अटक झाली होती.
एका ब्राझिलियन मॉडेलने केलेल्या तक्रारीमुळे सुद्धा त्याच्यावर तुरुंगात जायची वेळ आली होती. मॉडेलने मिकावर छळवणुकीचा आरॊप केला होता.
आपल्या गाण्यांसह अनेक कॉंट्रोव्हर्सीमध्ये अडकून फेमस झालेला हा गायक आपल्यासाठी वधू शोधायला सज्ज झाला आहे. आता त्याला वाढू सापडते का? आणि यापुढे तरी तो कॉंट्रोव्हर्सीच्या जाळ्यामधून बाहेर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.