17 सप्टेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या राजकारणानं एक वेगळं आणि रोमांचक वळणं घेतलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता भाजप नेते गोपीनाथ मुंडेही एमसीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीनाथ मुंडेंनी स्टायलो क्रिकेट क्लबचं सदस्यत्व स्विकारलंय. त्याआधी सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माझगाव क्रिकेट असोसिएशनतर्फे एमसीएचे प्रतिनिधी बनले. याशिवाय मनसेचे आमदार नितीन सरदेसाई पारसी क्रिकेट क्लबतर्फे तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर न्यू हिंदू क्रिकेट क्लबतर्फे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. 17 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक रंगणार आहे. दरम्यान, आपण माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य झालोत, पण राष्ट्रवादीची याबाबत काय भूमिका आहे हा त्यांचा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. MCAच्या आखाड्यात राजकारणी - पारसी पायोनिअर क्रिकेट क्लब - शरद पवार (राष्ट्रवादी) - माझगाव क्रिकेट क्लब - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) - मेरी क्रिकेट क्लब - उद्धव ठाकरे (शिवसेना) - स्टायलो क्रिकेट क्लब - गोपीनाथ मुंडे (भाजप) - इलेव्हन 77 स्पोर्ट्स क्लब - नारायण राणे (काँग्रेस) - यंग फ्रेंड्स क्रिकेट क्लब - आदित्य ठाकरे (युवा सेना) - दादर पारसी झोराष्ट्रीयन क्लब - नितीन सरदेसाई (मनसे) - प्रबोधन गोरेगाव क्लब - सुभाष देसाई (शिवसेना) - न्यू हिंदू क्रिकेट क्लब - मिलिंद नार्वेकर (शिवसेना) - मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) - एम.बी. युनियन क्रिकेट क्लब - सचिन अहिर (राष्ट्रवादी) - दादर स्पोर्ट्स क्लब - राहुल शेवाळे (शिवसेना) - राजस्थान क्रिकेट क्लब - आशिष शेलार (भाजप)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.