मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Sonali Kulkarni: अभिनेत्रीच्या नावाने सुरु केलं पाळणाघर; सोनालीच्या आईचा अनोखा कारनामा

Sonali Kulkarni: अभिनेत्रीच्या नावाने सुरु केलं पाळणाघर; सोनालीच्या आईचा अनोखा कारनामा

सोनाली कुलकर्णीच्या आईने केलेला हा अंगाला वेगळा कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सोनाली कुलकर्णीच्या आईने केलेला हा अंगाला वेगळा कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सोनाली कुलकर्णीच्या आईने केलेला हा अंगाला वेगळा कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  मुंबई 01 ऑगस्ट: अभिनेत्रींच्या नावाने हॉटेलची मेन्यूकार्ड असतात, कधी प्रेमाच्या भरात त्यांच्या नावाची दुकानं सुद्धा दिसू शकतात पण एखाद्या अभिनेत्रीच्या नावाने पाळणाघर असल्याचं कधी ऐकलं आहे का? मराठीतील एक नामंकित अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नावाने सुरु केलेल्या पाळणाघराचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने तिने आणि तिचा भाऊ संदेश कुलकर्णी याने खास पोस्ट शेअर केली आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या कसदार अभिनयाने नेहमीच उजवी ठरलेली अभिनेत्री (sonali kulkarni mother) सोनाली कुलकर्णी हिची आई जवळपास 15 वर्ष ‘सोनाली पाळणाघर’ चालवत होती. दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी त्या पाळणाघराचा वाढदिवस त्यांचे कुटुंबीय साजरे करत आले आहेत. सोनालीचा भाऊ संदेशने सुद्धा एक सुपर स्पेशल व्हिडिओ शेअर करत स्वतःच्या आईचा स्वतःच्या सासूबाईंच्या हस्ते म्हणजे ज्योती सुभाष यांच्या हस्ते छोटासा सत्कार करत तिच्या या कामगिरीचं कौतुकही केलं आहे. “जेष्ठ उद्योजिका सुचिता कुलकर्णी यांना पुरस्कार सोनाली पाळणाघर सुरु केल्याबद्दल, ज्योती सुभाष यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येत आहे.” असं संदेशने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसंच अभिनेत्री अमृता सुभाष सुद्धा सोनालीच्या आईला मिठी मारून अभिनंदन करताना दिसत आहे. स्वतःच्या आईने उद्योग चालवण्याची प्रेरणा दिली असं सुद्धा संदेशने यामध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट करून सोनालीच्या आईचं कौतुक केलं आहे.
  तर सोनालीने एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, “१ ॲागस्ट - लोकमान्य टिळकांचं पुण्यस्मरण आणि माझ्या आईच्या सोनाली पाळणाघराचा वाढदिवस पण १५ वर्षं आईनी सेवाभावानी केललं..आमच्या कुटुंबाला स्वावलंबी, सन्मानानं उभं करणारं काम.. शाब्बास आई ♥️” सोनालीने या पोस्टमध्ये लहानपणीचा फोटोदेखील शेअर केला आहे. स्वतःच्या आईने सुरु केलेल्या या व्यवसायाबद्दल तिला असलेला अभिमान या पोस्टमध्ये दिसून येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

  सध्या वर्क फ्रंटवर सोनाली बरीच सक्रिय आहे. ती येत्या काळात अनेक चांगल्या प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे. तिच्या ‘धारावी बँक’ नावाच्या एक आगामी प्रोजेक्टची काहीच दिवसांपूर्वी घोषणा सुद्धा झाली.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Mother, Sonali kulkarni

  पुढील बातम्या