• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • मोठी बातमी : योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत चूक, अपघातामधून बचावले

मोठी बातमी : योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत चूक, अपघातामधून बचावले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात (UP CM Yogi Adityanath) सध्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आझमगडमध्ये (Azamgarh) आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी चूक उघड झाली आहे.

 • Share this:
  आझमगड (उत्तर प्रदेश), 24 मे :  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात (UP CM Yogi Adityanath) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आझमगडमध्ये (Azamgarh) आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी चूक उघड झाली आहे. त्यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगच्यावेळी अचानक गाय समोर आली होती. त्यामुळे हेलीपॅडच्या सुरक्षेत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची धांदल उडली. हेलिकॉप्टरचा मोठा आवाज आणि ऊन यामुळे घाबरलेली गाय वेगाने हेलिपॅडच्या जवळून गेली. ही गाय वेळीच दूर झाल्याने मोठा अपघात टळला. असं असलं तरी योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेमध्ये चूक कुणामुळे झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आदित्यानाथ यांनी आझमगडमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर कोव्हिड कमांज सेंटरला भेट देण्यासाठी रवाना झाले. या भेटीनंतर ते सर्किट हाऊसकडे रवाना होतील. त्यानंतर योगी बिजौरा गावाचा दौरा करणार असून त्यानंतर ते पुन्हा आझमगडमधील पोलीस लाईनवरील हेलिपॅडवर पोहचतील. इथून ते हेलिकॉप्टरने चक्रानपूरला जाणार आहेत. युवकांचा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर हल्ला; आधी भररस्त्यात कपडे फाडले, मग... योगी आदित्यनाथ या दौऱ्यामध्ये वाराणसीला देखील भेट देणार आहेत. वाराणसीमध्ये ते कोव्हिड संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून योगींचा हा तिसरा वाराणसी दौरा आहे. यापूर्वी ते 9 मे रोजी वाराणसीचा दौरा केला होता. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.
  Published by:News18 Desk
  First published: