Home /News /news /

गडचिरोली जिल्हयात ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला यश; वाचा निकाल

गडचिरोली जिल्हयात ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला यश; वाचा निकाल

स्थानिक समीकरण पाहून पालकमंत्र्यांनी तयार केलेल्या रणनितीला यश मिळालं आहे .

    महेश तिवारी, प्रतिनिधी/गडचिरोली, 22 जानेवारी : जिल्ह्यात 350 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत ग्रामीण भागात महाविकास आघाडीला यश मिळाल्याचं चित्र पुढे आलं आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उभे करताना शक्य होईल तिथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवण्याची सूचना केली होती. स्थानिक समीकरण पाहून पालकमंत्र्यांनी तयार केलेल्या रणनितीला यश मिळालं आहे . गडचिरोली जिल्हयात दोन टप्प्यात ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. आज सकाळपासुन सुरु झालेल्या मतमोजणीचे दुपारपर्यंत निकाल आले आहेत. निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नसली तरी पालकमंत्री एकनाथ शिंदेसह जिल्ह्यातल्या तीनही आमदार प्रमुख पदाधिका-यांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने स्थानिक पातळीवर राजकिय समीकरणांनुसार निवडणुका झाल्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी यांचे दोन मेळावे आणि पदाधिका-यांच्या बैठका घेऊन  शिवसेनेन स्वतंत्र निवडणुक लढवताना शक्य असेल तिथे महाविकास आघाडीने निवडणुक लढवावी अशी सूचना केली होती. हे ही वाचा-पत्नी की वडील? मृत व्यक्तीच्या स्पर्मवर कोणाचा हक्क; उच्च न्यायालयाचा निर्णय त्यानुसार महाविकास आघाडीने  बहुतांश ठिकाणी निवडणूक लढवली. त्यात यश मिळाल्याचे चित्र आज दिसुन येत आहे. कोरची तालुक्यात 13 देसाईगंज आरमोरी गडचिरोली तालुक्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर आरमोरीत सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दहापेक्षा जास्त ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे. देसाईगंज तालुक्यात मोठी ग्राम पंचायत असलेल्या कुरुड ग्राम पंचायत शिवसेनेकडे तर सर्वाधिक ट्रॅक्टर असलेले गाव अशी ओळख असलेल्या विसोरा ग्राम पंचायतीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे...अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द आदीवासी विद्यार्थी संघटना अशी लढत होऊन काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ग्रामपंचायतीत आविसला यश मिळाले आहे. आलापल्ली सारख्या जिल्हयातल्या मोठ्या ग्रामपंचायतीत कुणालाही  बहुमत नाही, मात्र येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या पॅनलला सहा तर आविसलाही सहा जागा मिळाल्या आहेत.  दरम्यान गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेत्या आदीवासी विद्यार्थी संघटनेला वेंकटापुर कमलापुर रेपनपल्ली सारख्या मोठया ग्राम पंचायतीत यश मिळालं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gadchiroli, Gram panchayat

    पुढील बातम्या