जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अंत्यसंस्काराला पैसे नाही म्हणून अंगणात पुरला भावाचा मृतदेह, शेजाऱ्यांना सांगितल धक्कादायक कारण

अंत्यसंस्काराला पैसे नाही म्हणून अंगणात पुरला भावाचा मृतदेह, शेजाऱ्यांना सांगितल धक्कादायक कारण

अंत्यसंस्काराला पैसे नाही म्हणून अंगणात पुरला भावाचा मृतदेह, शेजाऱ्यांना सांगितल धक्कादायक कारण

युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाने आणि दोन पुतण्यांनी त्याचा मृतदेह अंगणातच पुरला. कारण…

  • -MIN READ
  • Last Updated :

भागलपूर, 24 मे : कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक धक्कादायक धटना समोर आल्या. असाच एक संशयास्पद घटना घडली आहे. एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाने आणि दोन पुतण्यांनी त्याचा मृतदेह अंगणातच पुरला. अंत्यविधीसाठी पैसे नव्हते म्हणून असं करणं हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता असं मृताच्या भावाचं म्हणणं आहे. पण गंभीर म्हणजे, त्यांनी शेजाऱ्यांना विचारून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा खोदला होता. पण त्यात मृतदेह पुरल्याचं समजताच सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारच्या भागलपूरमध्ये ईशाचक पोलीस स्टेशन परिसरातील आहे. याविषयी सगळीकडे खळबळ उडाताच पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. तर शेजाऱ्यांनी मृताच्या भावावर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार आता पोलीस पुढील प्रकरणाचा शोध घेत आहे. कुटूंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गुड्डू मंडल हा कचरा उचलणारा म्हणून काम करत होता आणि तो अपस्मारच्या आजाराने त्रस्त होता. रात्री त्याला त्रासदेखील झाला, त्यानंतर घरातील लोकांनी त्यांचे हातपाय दाबून त्याला शांत केलं. अपस्मार रोगाचा बर्‍याच वेळा उपचार केल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे. सकाळी मृताचा भाऊ ओमप्रकाश मंडलने गुड्डूला पाहिलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यानंतर त्याच्या दोन मुलांनी नीरज आणि राजा यांच्या मदतीने घराच्या अंगणात एक खड्डा खोदला आणि मृत गुड्डू मंडलचा मृतदेह तिथे पुरला. शेजार्‍यांना आला संशय एका शेजाऱ्याने मृताचा भाऊ ओमप्रकाश मंडल आणि दोन मुलांना एक मृतदेह लपवताना पाहिलं. त्यानंतर शेजाऱ्यांनी नगरसेविका कल्पना देवी यांच्यासह ईशाचक पोलीस स्टेशन कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, अंगण खोदलं आणि मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेजार्‍यांना आहे खुनाचा संशय मृत गुड्ड्यूच्या कुटुंबियांनी त्याच्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं तर मुलाची हत्या करून मृतदेह लपवल्याची चर्चा शेजाऱ्यांमध्ये सुरू आहे. यावेळी उपस्थित असलेल्या नगरसेविका कल्पना देवी म्हणाल्या की, शेवटच्या संस्कारांना तातडीने मदत देण्याची महापालिकेची स्पष्ट तरतूद आहे. या व्यतिरिक्त सामाजिक पातळीवर लोक आपापसात सामाजिक जबाबदारी म्हणून सहकार्य करून गरीब किंवा लावारिस मृतदेहांच्या अंत्यसंस्कार करण्याची परंपरा पार पाडत आहेत, अशा परिस्थितीत पैशाअभावी मृतदेह घरात अंगणात दफन करणं संशयास्पद आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर हत्या की आत्महत्या याचा अंदाज येईल. त्यानुसार पुढील तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात