• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • SSC Result Maharashtra: दुपारी एक वाजता 10 वीचे विद्यार्थी बोर्डाच्या 'या' वेबसाइटवर 'या' सोप्या स्टेप्सनं बघू शकतील निकाल

SSC Result Maharashtra: दुपारी एक वाजता 10 वीचे विद्यार्थी बोर्डाच्या 'या' वेबसाइटवर 'या' सोप्या स्टेप्सनं बघू शकतील निकाल

Maharashtra 10th Result:विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे. हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार आहे. (SSC Result 2021)

  • Share this:
    मुंबई, 16 जुलै: आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा (Maharashtra 10th result) होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे. हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक(SSC result 2021 Maharashtra Board ) व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येईल. हेही वाचा- आज एक वाजता या वेबसाईटवर बघता येईल दहावीचा निकाल या सोप्या स्टेप्सनं निकाल बघा काही मिनिटात तुमच्या समोर येईल निकाल निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा. आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका. लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published: