मथुरा, 4 मे : लॉकडाऊनदरम्यान पोलीस मदतीसाठी धावून गेल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. मात्र उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मथुरामधील एका पोलीस चौकीचे प्रमुख आणि 3 जवानांनी मिळून 5822 दारूच्या पेट्या बाजारात विकल्या. या दारुच्या पेट्या पोलिसांनी विविध ठिकाणांहून जप्त केल्या होत्या. या दारूची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एसएसपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करीत त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये स्वत: एसएसपी यांनी या प्रकरणात खुलासा केला आहे. यामध्ये एका दारू माफियाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
जप्त केलेल्या दारूच्या विक्रीचा झाला भांडाफोड
काही दिवसांपूर्वी कोसीकलामध्ये दारुने भरलेला ट्रक पकडण्यात आला होता. ट्रक जप्त केल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेतला होता. मात्र काही दिवसांनी ट्रकमधून अर्धी दारू गायब झाली. याबाबत एसएसपी मथुरा यांना माहिती मिळाली. त्यांनी काही जवानांसह स्टिंग ऑपरेशन केलं. गायब झालेली दारू खरेदी करण्यासाठी ही टीम दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोहोचली. तेथेच आरोपी जवानाची कार उभी होती. त्याने गाडीतून काढून दारूची बाटली दिली. त्यानंतर टीमने त्या पोलिसाला ताब्यात घेतले. कोरोनाच्या संकटात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 35 हून अधिक दिवसांपासून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आज काही भागांमध्ये दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहे. मात्र वाढणारी गर्दी पाहता अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
संबंधित-कोरोनानंतर देशात लोकसंख्या वाढीचं संकट? आरोग्य मंत्रालयाला दिला इशारा
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.