Home /News /national /

कोरोनानंतर देशात लोकसंख्या वाढीचं संकट? आरोग्य मंत्रालयाला दिला इशारा

कोरोनानंतर देशात लोकसंख्या वाढीचं संकट? आरोग्य मंत्रालयाला दिला इशारा

एका सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. यानुसार कोरोनानंतर भविष्यात लोकसंख्या वाढीच संकट उभं राहण्याची शक्यता आहे

    डेहराडून, 4 मे : एकीकडे संपूर्ण देश कोरोना (Coronavirus) संकटाचा सामना करीत असून यासाठी सरकार लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी वाढवत आहे. तर दुसरीकडे एक वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. आता डेहराडून जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाने (District Legal Services Authority) एक सर्व्हे केला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानंतर आरोग्य मंत्रालयाला (Health Ministry) सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात लिहिले आहे की, लॉकडाऊनमुळे लोकसंख्या जलद गतीने वाढू शकते. यामागे अनेक कारणं आहेत. अनेक ठिकाणी महिलांना गर्भनिरोधक औषधे मिळत नसल्याचेही एक महत्त्वाचे कारण आहे. शहरांमध्येही मोठी समस्या केवळ ग्रामीण भागात ही समस्या नाही. तर शहरांमध्येही महिलांसमोर अनेक प्रश्न आहेत. डीएलएसएची टीम जेव्हा कंटेन्टमेंट झोनसह अन्य भागात रेशन वाटप करण्यासाठी गेली तेव्हा महिलांनी गर्भनिरोधक गोळ्यांबाबत प्रश्न विचारला. औषधं घेत नसल्यामुळे त्यांना भीती वाटत असल्याचे त्या महिलांनी सांगितले. गर्भनिरोधक औषधे आणि सॅनिटरी नॅपकीनचे वाटप अनेक झोपडपट्टी भागात गर्भनिरोधक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे. डीएलएसएने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही राष्ट्रीय समस्या असल्याची माहिती दिली. कंटेन्टमेंट झोनमध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि सॅनिटरी नॅपकीनचे वाटप आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या संकटानंतर देशात लोकसंख्यावाढीची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीत यासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये यासंदर्भात समस्या असल्यास त्या सोडविण्यालाठी पुढे येणं आवश्यक आहे. संबंधित-लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचाराची धक्कादायक कारणं आली समोर, पोलिसही झाले हैराण
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Population

    पुढील बातम्या