Live Update: माहिम-वांद्रे खाडीलगतच्या भागात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

माहिम-वांद्रे रेक्लमेशन खाडीलगतच्या भागात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • | December 13, 2022, 15:35 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 3 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    18:44 (IST)

    सोलापूरमधील 11 गावांना प्रशासनाची नोटीस
    कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्यानं नोटीस
    'सरपंच, ग्रामसेवकांनी 24 तासांत खुलासा करा'

    18:44 (IST)

    सोलापूरमधील 11 गावांना प्रशासनाची नोटीस
    कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्यानं नोटीस
    'सरपंच, ग्रामसेवकांनी 24 तासांत खुलासा करा'

    15:40 (IST)

    राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
    'जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करणार'
    'राज्यातील शाळांना 1100 कोटींचं अनुदान'
    महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींचा राजीनामा स्वीकृत
    कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती
    आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील कर्मचारी
    'त्या' 1585 रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार
    खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय
    मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड
    ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार
    गगनबावडा आणि जत तालुक्यात ग्राम न्यायालय
    शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना
    राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार
    कोकणातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार
    शासनमान्य सार्व. ग्रंथालयाच्या अनुदानात 60% वाढ
    कामगार कायद्यांमधील कालबाह्य तरतुदी काढणार
    कामगार कायद्यात आता कारावासाऐवजी वाढीव दंड
    आंबेगांव बु. शिवसृष्टी प्रकल्पास 50 कोटी अनुदान
    75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार
    पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय, कर्जत
    दोन स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना शासन मान्यता
    ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी निर्गुन्हेगारीकरण करणार 

    15:35 (IST)

    माहिम-वांद्रे खाडीलगतच्या भागात भीषण आग

    अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

    आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

    14:35 (IST)

    नाशिक - 2013 मधील विपीन बाफना हत्या प्रकरण
    2 जण दोषी, 3 संशयितांची न्यायालयाकडून मुक्तता
    खंडणीसाठी अपहरण करून केली होती निर्घृण हत्या 

    13:12 (IST)

    ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम सुनावणी
    सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रित मुद्दे मांडण्याची सूचना
    आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार

    13:2 (IST)

    मुख्यमंत्री शिंदे 16 डिसेंबरला कोकण दौऱ्यावर
    बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत घेणार आढावा
    मुख्यमंत्री अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार

    12:43 (IST)


    नागपुरात 2 आठवड्यांचं हिवाळी अधिवेशन 
    हिवाळी अधिवेशन 19 ते 30 डिसेंबरपर्यंत

    12:17 (IST)

    मलिकांच्या जामिनावर हायकोर्टात सुनावणी
    मलिकांच्या जामिनावर सुनावणी 6 जानेवारीला
    मनी लॉड्रिंगप्रकरणी नवाब मलिक अटकेत

    11:24 (IST)

    उद्धव ठाकरेंच्या पक्षांची मागणी कोर्टानं नाकारली
    7 न्यायाधिशांच्या घटनापीठाची केली होती मागणी
    5 न्यायाधिशांच्या घटनापीठासमोरच होणार सुनावणी

    Live Update: माहिम-वांद्रे रेक्लमेशन खाडीलगतच्या भागात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.