रश्मी अनपट ही अभिनेत्री सध्या विठ्ठल भक्तीत रममाण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी एक अनोखं फोटोशूट तिने करून घेतलं आहे. रश्मीने पारंपरिक मराठी पोशाख करत कपाळी चंद्रकोर लावत एक सुंदर फोटोशूट केलं आहे. याचसोबत हातात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन रश्मीने आपली भक्ती प्रकट केली असल्याचं दिसून येत आहे. तसंच तिने ‘माऊली माऊली’ गाण्यावर एक अप्रतिम रीलसुद्धा शेअर केलं आहे. रश्मी सध्या ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत दिसून येत आहे. रश्मीच्या या अनोख्या फोटोशूटचं खूप कौतुक होताना दिसत आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोवर शुभेच्छा देत लोकांनी प्रेम व्यक्त केलं आहे.