जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / एका रात्रीत बदललं नशीब; अवघ्या 100 रुपयांमुळे ठेकेदार आणि मजूर झाले कोट्यधीश

एका रात्रीत बदललं नशीब; अवघ्या 100 रुपयांमुळे ठेकेदार आणि मजूर झाले कोट्यधीश

एका रात्रीत बदललं नशीब; अवघ्या 100 रुपयांमुळे ठेकेदार आणि मजूर झाले कोट्यधीश

लुधियानामध्ये 100 रुपयांतून मजूर आणि ठेकेदाराचं नशीब बदललं आहे. एका रात्रीत दोघेही करोडपती बनलेत. आता मजुरी सोडून चांगलं आयुष्य जगण्याचं त्यांचं स्वप्न पुर्ण होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंजाब, 17 एप्रिल : एका रात्रीत आपलं नशीब बदलावं असं अनेकांना वाटत. एखादी लॉटरी**(lottery)** लागावी आणि करोपती (Millionaire) बनाव यासाठी कितीतरीजण प्रार्थना करत असता. सगळ्यांचीच ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही. मात्र पंजाबमधील पठानकोट जवळच्या अखरोटा गावातल्या दोघांना 1 कोटीची लॉटरी लागली. अखरोट गावातील मजुर बोधराज आणि ठेकेदार टिंकू कुमार यांनी पंचाब स्टेट लॉटरीचं (punjab state lottery) या आठवड्याचं बक्षीस जिंकलंय. लुधियानामध्ये न्यायाधीशांच्या हजेरीत बुधवारी ड्रॉ काढण्यात आला. शुक्रवारी दोघांनाही लॉटरी विभागामधुन (Lottery department) फोन गेला. आपण करोडपती झाल्याचं समजतात दोघांनीही आनंदोत्सव साजरा केला. हे ही वाचा- WhatsAppवर युजर्स होत आहेत आपोआप बॅन, जाणून घ्या कारण  14 एप्रिलला घेतलं होतं तिकीट**.** लॉटरी जिंकल्याचं कळताच मजुर बोधराजने तिकीट विक्रत्याचे तोंड गोड केलं. 14 एप्रिलला त्याने अशोक बावा यांच्या दुकानामधुन लॉटरीचं 100 रुपयाचं तिकीट घेतलं. त्यावेली त्यांना वाचलेही नव्हतं की, त्यांना 1 कोटीची लॉट्री लागेल. बोधराज यांना हे सगळं स्वप्नवत वाटतंय. बोधराज उदरनिर्वाहासाठी मजुरी करतात. आता त्यांच आणि त्यांच्या परिवाराचे नशीब बदललं आहे. लॉटरीच्या पैशातील काही राशी ते मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे, त्यांना मुलींना आत्मनिर्भर बनवायचं आहे. 15 वर्षांच्या प्रयत्नांनंतर दिली नशीबाने साथ टिंकू कुमार हे राजापुरामध्ये ठेकेदार आहेत. गेल्या 15 ते 16 वर्षांपासुन ते नियमितपणे पंजाब स्टेट लॉटरीचं तिकीट घेत होते. यावेळी त्यांच्यासाठी चमत्कार घडलाय. त्याना 1 करोडचं बक्षील मिळालंय. टिंकू कुमार यांना 1 मुलगा आणि एक मुलगी आहे. मिळाल्या पैशातुन व्यवसाय वाढवण्याबरोबर मुलांना चांगलं शिक्षण देऊन अधिकारी बनवणार असल्याचं ते सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lottery , panjab , price
  • First Published :
जाहिरात
जाहिरात