मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Career Tips: MBA नंतर भरघोस पगाराची नोकरी हवीये? मग प्रवेश घेण्याआधी करा 'हे' काम; यश तुमचंच

Career Tips: MBA नंतर भरघोस पगाराची नोकरी हवीये? मग प्रवेश घेण्याआधी करा 'हे' काम; यश तुमचंच

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्या MBA मध्ये प्रवेश घेण्याआधी तुम्हाला कामी येऊ शकतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्या MBA मध्ये प्रवेश घेण्याआधी तुम्हाला कामी येऊ शकतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्या MBA मध्ये प्रवेश घेण्याआधी तुम्हाला कामी येऊ शकतात.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 17 नोव्हेंबर: दरवर्षी देशातील हजारो आणि लाखो तरुणांना भारतातील नामांकित व्यवस्थापन संस्थांमधून एमबीए कोर्स (Career in MBA) केल्यानंतर चांगल्या पॅकेजच्या (Package after MBA) नोकऱ्या मिळतात. मात्र सर्वांनाच भरघोस पगाराची नोकरी (Jobs After MBA) मिळेलच असं नाही. त्यामुळे MBA कोर्स (MBA Courses) केल्यानंतर चांगली कमाई करण्यासाठी काही खास टिप्सचा (Career tips for MBA) विचार करणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्या MBA मध्ये प्रवेश घेण्याआधी तुम्हाला कामी येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया.

विषय हुशारीने निवडा

बारावीनंतर विषय निवडताना काळजी घ्यावी. जर तुम्हाला नंतर एमबीए करायचे असेल तर ग्रॅज्युएशनमध्ये फक्त तेच विषय घ्या, जे तुम्हाला नंतर एमबीए करण्यास मदत करतील. तसेच, इंग्रजीवर विशेष लक्ष द्या कारण बहुराष्ट्रीय कंपन्या इंग्रजीला खूप प्राधान्य देतात.]

Career in Numerology: न्यूमरोलॉजीमध्ये घडवा तुमचं करिअर; वाचा संपूर्ण माहिती

बिझिनेस वर्ल्डवर लक्ष ठेवा

शेअर बाजारातील बदलांकडे दुर्लक्ष करू नका, बाजाराचा मागोवा घ्या, कंपनीची पुनर्रचना कशी होते, कंपनी-नोंदणी हाताळण्याशी संबंधित कायदा आणि व्यावसायिक जग इ. त्यांच्यावर केस स्टडी करा. यासाठी ऑनलाइन भरपूर साहित्य उपलब्ध आहे, परंतु या विषयांवर तुमचे मित्र, सहकारी इत्यादींशी सखोल चर्चा करा. यामुळे ज्ञानाचा पाया मजबूत होईल.

एमबीए स्पेशलायझेशनबाबत योग्य निर्णय घ्या

एमबीए इन फायनान्स, एमबीए इन मार्केटिंग, एमबीए इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, एमबीए इन इंटरनॅशनल बिझनेस, एमबीए इन ऑपरेशन मॅनेजमेंट, एमबीए इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे अनेक कोर्स आहेत. तुमच्या आवडीनुसार तुमचा कोर्स निवडा एमबीए कोर्स करत असताना जर तुम्ही निष्काळजी असाल किंवा नोकरीच्या मुलाखतीबाबत गंभीर नसाल तर पगाराच्या बाबतीत तुम्ही मागे राहाल.

First published:

Tags: Career opportunities, MBA