सोलापूर, 29 मे : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) आणि मंत्र्यांवर (Ministers) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुखांनंतर (Anil Deshmukh) आता अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर लागला असून पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा (Jitendra Awhad) असल्याचं सोमय्या म्हणाले. सरकारमधल्या विविध मंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांवर यावेळी सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. (वाचा- चंद्रकांत पाटलांनी ते वक्तव्य जागं असताना केलं की झोपेत;अजितदादांनी घेतला समाचार ) सचिन वाझेवर झालेल्या कारवाईत पाच अधिकारी निलंबित झाले आहेत. परमबीर सिंग घरी गेले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता सध्या अनिल परबांचा नंबर असून त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल असा दावा सोमय्यांनी केला. भाजप उद्धव ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असंही सोमय्या म्हणाले. राज्यातील सरकारनं खुशाल पाच वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करणार असल्याचं सोमय्या म्हणाले. (वाचा- बाजूच्या व्यक्तीलाही कळणार नाही तुम्ही WhatsAppवर काय बोलताय!असं लपवा पर्सनल चॅट ) यावेळी सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांना 55 लाख रुपये परत करावे लागले आहेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरए चे गाळे ढापल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत सोमय्यांनी संकेत दिले. कोरोना लसीकरणावरून मुंबईमध्ये काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळं झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत असल्याची टीकाही किरीट सोमय्या यांनी केलीय. एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लस चा काय संबंध आहे असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केलाय. भाजप भविष्यात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणारं असल्याचंही सोमय्या म्हणाले. तसंच 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक भारतीयाचं लसीकरण झालेलं असेल असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.