ढाका, 01 जून : 70 वाघांची हत्या (Tiger Killer) करणारा हबीब तालुकदार (Habib Talukdar) अखेर पकडला गेला आहे. बांगलादेशचा नागरिक (Bangladesh Citizen) असलेला हा व्यक्ती सुंदरबन परिसरामध्ये वाघांच्या हत्या करायचा. 20 वर्षांपासून पोलिस त्याच्या शोधात होते. पण अनेकदा तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. मात्र अखेर पोलिसांनी त्याला पडलं असून वनविभागानंही आता यामुळं सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
(वाचा-कुरकुरीत कीडे, चॉकलेटमधील टोळ...; Insect food ला अन्न सुरक्षा संस्थेचीही मंजुरी)
हबीब याला स्वतःला टायगर हबीब म्हणून घेणं आवडत होतं. त्याने स्वतःबाबत परिसरामध्ये बऱ्याच वावड्या उठवल्या होत्या. त्याच्याशिवाय वाघांचा सामना कोणीत करू शकणार नाही, अशी प्रतिमा त्यानं तयार करून ठेवली होती. प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांबरोबर हातमिळवणी करून पैशासाठी तो हे काम करायचा. तस्कर प्राण्यांना जीवंत किंवा मारून चीनकडे पाठवत होते. पण वाघांना मात्र मारून टाकलं जात होतं. त्यानंतर त्यांची कातडी, हाडे, दात, नखं काढून त्याची विक्री केली जायची. काही लोक तर अवैधरित्या वाघाचे मांसही खरेदी करायचे.
(वाचा-Corona : मुंबई-पुण्यात परिस्थिती आणखी नियंत्रणात, अनलॉकनंतर काय होणार?)
हबीब तालुकदार याचं वय 50 वर्षे आहे. त्यानं मध आणण्यासाठी म्हणून जंगलात जायला सुरुवात केली होती. पण पैश्याच्या हव्यासापोटी तो वाघांची शिकार करू लागला. त्यानं स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं होतं. लोक म्हणायचे की तो मामा म्हणजे वाघालाही घाबरत नाही. सुंदरबन परिसरात या वाघांना मामा म्हणतात.
भारत आणि बांगलादेश दोन्हीमध्ये पसरेल्या सुंदरवनमध्ये हबीब हे काम करायचा. बंगाल टायगर म्हणून ओळख असलेले इथले वाघ आकाराने सायबेरीयन वाघापेक्षा अगदी थोडे लहान असले तरी त्यांची इतर वैशिष्ट्ये पाहता ते सर्वांना पछाडू शकतात. विशेष म्हणजे सुंदरबनमध्ये समुद्राचं पाणी भरलेलं असलेल्या हे वाघ उत्तम पोहूदेखिल शकतात. हबीबला पकडल्यानंतर बांगलादेश वनविभागाला दिलासा मिळाला आहे. 2004 नंतर इथली वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली आहे. 2004 मध्ये इथं 440 वाघ होते. 2015 मध्ये ती संख्या 106 वर आली. नंतर सरकारी प्रयत्न केल्यानंतर 2019 मध्ये हा आकडा वाढून 114 झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.