जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कर्ण कवच सिस्टम काय आहे? भारताचा सोल्जर होईल तयार, भेदणं शत्रूलाही जाईल कठीण

कर्ण कवच सिस्टम काय आहे? भारताचा सोल्जर होईल तयार, भेदणं शत्रूलाही जाईल कठीण

कर्ण कवच सिस्टम काय आहे? भारताचा सोल्जर होईल तयार, भेदणं शत्रूलाही जाईल कठीण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या एक्स्पोला भेट देऊन कर्ण कवच सिस्टीमची पाहणी केली. यामुळे भारतीय जवान भविष्यात कर्णाच्या कवचाप्रमाणे सुरक्षित आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतील.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : परकीय आक्रमणाचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी जवानांकडे प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रं असणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्र सरकार अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मिती आणि खरेदीवर भर देत आहे. गुजरातमध्ये सध्या डिफेन्स एक्स्पो सुरू आहे. या एक्स्पोमध्ये अशा शस्त्रास्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कर्ण कवच सिस्टीम सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या एक्स्पोला भेट देऊन कर्ण कवच सिस्टीमची पाहणी केली. यामुळे भारतीय जवान भविष्यात कर्णाच्या कवचाप्रमाणे सुरक्षित आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतील. या सिस्टीममध्ये आपल्या जवानांसाठी खास सुरक्षा, संपर्क यंत्रणा आणि शस्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स आहेत. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील डिफेन्स एक्स्पोमध्ये ज्या कर्ण कवच सिस्टीमची माहिती घेतली, ती सिस्टीम भविष्यात भारतीय जवानांसाठी संरक्षण कवच असेल. रात्रीच्या वेळी अंधारात, तसंच दाट धुक्यात पाहण्यासाठी खास उपकरणं असतील. संरक्षण आणि आक्रमणासाठी घातक शस्त्रं ही या कर्ण कवचातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. असॉल्ट रायफल्समध्ये होलोग्राफिक आणि रिफ्लेक्स साइट्स असतील. या दोन्ही बाबी हेल्मेटवर लावलेल्या दुर्बिणीने जोडल्या जातील. यामुळे सैनिक 360 अंशांत कुठेही पाहू शकतात. कर्ण कवच सिस्टीममध्ये मल्टीमोड हँड ग्रेनेड असतील. हे ग्रेनेडही स्वदेशी कंपनीकडून घेतले जाणार आहेत. या सिस्टीममध्ये संवाद साधण्यासाठी स्विच एमपीआरए कम्युनिकेशन सिस्टीम असेल. यामुळे सैनिकांना जवळच्या अंतरावर मेसेज पाठवता येईल. याव्यतिरिक्त या कवच सिस्टीममध्ये अनेक शस्त्रं आणि यंत्रणा समाविष्ट असतील. 18 डिग्रीवर AC अन् पांघरूण, कारने जिमला; पंतप्रधान मोदींनी पिळले कान कर्ण कवच सिस्टीममधली आयआरडीई बीईएल लेजर डॅझलर ही एक विशेष यंत्रणा आहे. हा एक खास लेसर असून, त्याचा वापर इशारे देण्यासाठी, रेस्क्यू ऑपरेशन आणि हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो. हा 20 लाइट अ‍ॅम्प्लिफिकेशन क्षमतेचा लेसर असून त्याची रेंज अनेक किलोमीटरपर्यंत आहे. इशारा देण्यासाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो. तसंच लेसर गायडेड क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब फायर करण्यासाठी हा लेझर वापरला जाऊ शकतो. या कवच सिस्टीममध्ये एसएमपीपी बीआरजे बुलेट प्रूफ जॅकेट समाविष्ट आहे. हे जॅकेट स्वदेशी असून त्याचं वजन नऊ किलोग्रॅम आहे. या जॅकेटमुळे जवानाची मान, छाती, शरीराचा बाजूचा भाग आणि मांडीचा भाग सुरक्षित राहील. विशेष अशा बॅलिस्टिक मटेरियलपासून या जॅकेटची निर्मिती करण्यात आली आहे. जॅकेटचं डिझाइन डीआरडीओने केलं असून, एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हे जॅकेट तयार केलं आहे. जॅकेटच्या समोरच्या आणि मागच्या भागात हार्ड आर्मर पॅनेल आहे. यामुळे जगातल्या कोणत्याही असॉल्ट रायफलची गोळी निष्प्रभ ठरेल. यासाठी नवीन तंत्रज्ञानापासून बनवलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. एमकेयू एसीएच बुलेटप्रूफ हेल्मेट हखास पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे. त्याचं वजन एक ते दीड किलो आहे. डोक्याच्या आकारानुसार हेल्मेटचा आकार आणि वजन निश्चित करण्यात आलं आहे. 45 कॅलिबरच्या बुलेट, पिस्तुल आणि 357 सिग एफएमजे एफएन, 44 मॅग्नम, 9 मिमी एफएमजे यांसारख्या पिस्तुल आणि रायफल्सच्या गोळ्यांचा या हेल्मेटवर कोणाताही परिणाम होणार नाही. याशिवाय बॉम्ब फुटल्यावर किंवा मोर्टारचे छर्रे, तसंच वेगाने येणाऱ्या कोणत्याही धातूच्या तुकड्यांपासून हे हेल्मेट सैनिकांचे संरक्षण करील. मोदी…मोदी…मोदी… घोषणा ऐकून PM भारावले; सुरक्षा कवच सोडून रस्त्यावर आले आणि…; काय घडलं पाहा VIDEO स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल AK-203 ही असॉल्ट रायफल एके सीरिजमधली अत्याधुनिक रायफल आहे. या रायफलची निर्मिती इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. Ak-203 ही इन्सासपेक्षा अधिक प्राणघातक आणि चालवायला सोपी आहे. ही रायफल आकाराने लहान आणि वजनाने हलकी आहे. Ak-203 रायफलचं वजन 3.8 किलोग्रॅम असून, तिची लांबी 705 मिमी आहे. वजन आणि लांबी कमी असल्याने ही रायफल बराच काळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. ही रायफल दीर्घ अंतरावर नेताना जवानांची दमछाक कमी होते. तसंच ती हाताळायला सोपी आहे. Ak-203साठी 7.62x39mm आकाराच्या गोळ्या आवश्यक असतात. या गोळ्या जास्त प्राणघातक असतात. 800 मीटर अशी तिची रेंज असते. त्यामुळे दूरवरचा शत्रूदेखील टिपता येतो. Ak-203 सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकारे चालते. ही रायफल एका मिनिटात 600 गोळ्या झाडू शकते. यात 30 राउंडचं बॉक्स मॅगझिन आहे. ही रायफल गॅस ऑपरेटेड रोटेटिंग बोल्ट तंत्रावर चालते. Ak-203 मध्ये अ‍ॅडजस्टेबल आयर्न साइट आहे. याशिवाय त्यावर पिकॅटिनी रेल लावण्यात आली आहे. यामुळे या रायफलवर जगातली कोणत्याही प्रकारची दुर्बीण किंवा माउंट अर्थात लाइट मशीनगन लावू शकता. याचाच अर्थ माउंट जितकी शक्तीशाली तितका हल्ला प्राणघातक असतो. आयडब्ल्यू एनजी-7 जीपीएमजी ही एक हलकी मशीनगन आहे. ही जगातल्या सर्वांत विश्वसनीय मशीनगनपैकी एक आहे. इस्रायलने या मशीनगनची निर्मिती केली आहे. 1997पासून या मशीनगनचा सातत्याने वापर होत आहे. यासाठी ड्रम मॅगझिन गरजेची असते. ही गन एका मिनिटात 700 गोळ्या झाडते. गोळ्या 860 मीटर प्रतिसेकंद या वेगाने चालतात. हिची रेंज 1200 मीटर आहे. याचाच अर्थ या गनच्या गोळ्या सव्वा किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्याही चिंधड्या उडवू शकतात. या मशीनगनमध्ये 100 ते 125 राउंडचा बेल्टही लावता येतो. पिकॅटिनी रेल किंवा कोणत्याही प्रकारची माउंटही या गनवर लावता येते. सिग 716i सेमी ऑटोमॅटिक रायफलमध्ये 7.62x51mm च्या गोळ्या असतात. या गोळ्या Ak-203च्या गोळ्यांप्रमाणेच घातक असतात. या रायफलचा समावेश 2020 मध्ये जगातल्या दहा सर्वोत्तम AR-10 रायफल्सच्या यादीत करण्यात आला होता. या रायफलमध्ये शॉर्ट स्ट्रोक पिस्टन आणि रोटेटिंग बोल्ट तंत्राचा वापर केला गेला आहे. या रायफलची फायरिंग रेंज 500 मीटर आहे. या रायफलमध्ये 10,20,30 राउंडचे बॉक्स मॅगझिन वापरले जातात. Ak-203 प्रमाणे या रायफलवर आयर्न साइट्स लावता येतात. या रायफलमध्ये पिकॅटिनी रेल बसवण्यात आली आहे. यामुळे जगातली कोणतीही दुर्बीण किंवा माउंट या रायफलवर बसवता येते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात