जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Job Alert : मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महावितरणमध्ये नोकरीची संधी; अर्ज कुठे आणि कसा कराल?

Job Alert : मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महावितरणमध्ये नोकरीची संधी; अर्ज कुठे आणि कसा कराल?

Job Alert :  मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महावितरणमध्ये नोकरीची संधी; अर्ज कुठे आणि कसा कराल?

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे. उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी एकूण आठ जागा आहेत. यासाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा समतुल्य तसेच 12 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जून : बेरोजगारांची (Unemployment) संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. चांगल शिक्षण आणि क्षमता असूनही अनेकांना नोकरीपासून वंचित राहावं लागतं. अनेकदा नोकरी (Job Alert) कुठे उपलब्ध आहे हे माहित होत नसल्याने तरुणांना बेरोजगार राहावं लागतं. त्यामुळे नोकरीच्या संधी (Job Opportunity) कुठे आहेत याबद्दल माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट, महावितरण (नाशिक)  येथे जागा निघाल्या आहेत. >> मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Teust) मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे. उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी एकूण आठ जागा आहेत. यासाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा समतुल्य तसेच 12 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. उपमुख्य दक्षता अधिकारी पदासाठी एक जागा आहे. यासाठी पदवीधर असण्याची असण्याची अट आहे. 42 वर्षांपर्यंत वयोमर्यादा यासाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22,23,27 जून 2022 आहे. www.mumbaiport.gov.in या वेबसाईटवर तुम्ही अधिकचे तपशील पाहू शकता. विद्यार्थ्यांनो, करिअरचं क्षेत्रं निवडताना करू नका चुका; ‘या’ टिप्स करिअर निवडण्यास करतील मदत; वाचा सविस्तर अर्ज कुठे पाठवाल? सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, S.V.मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001 >> महावितरण, नाशिक (MSEB, Nashik) नाशिक येथील महावितरण कार्यालयात इलेक्ट्रिशियन, वायरमन साठी भरती होत आहे. यासाठी 10 वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. एकूण 149 जागांसाठी ही भरती आहे. 18 ते 21 वर्षांपर्यंतचे उमदेवार यासाठी अर्ज करु शकतील. 3 जून 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकची माहिती तुम्ही www.mahatransco.in या वेबसाईटवर तपासू शकता. मेहनतीला सलाम! दिवसभर नोकरी आणि रात्री अभ्यास करून क्रॅक केली UPSC; इंजिनिअर झाला IAS अर्ज कुठे पाठवायचा? अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिक रोड, नाशिक – 422101

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात