मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

28 मार्चला ISRO चं खास उपग्रह घेणार अवकाश भरारी; चीन-पाकवर ठेवता येणार करडी नजर

28 मार्चला ISRO चं खास उपग्रह घेणार अवकाश भरारी; चीन-पाकवर ठेवता येणार करडी नजर

ISRO News: सीमावर्ती भागात शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी भारत (India) 28 मार्च रोजी एक खास उपग्रह प्रक्षेपित (will launch GISAT1) करणार आहे. यामुळे सीमेवर सुरू असलेल्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवता येणार आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 07 मार्च: सीमावर्ती भागात शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी भारत 28 मार्च रोजी एक खास उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यामुळे सीमेवर सुरू असलेल्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवता येणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तींची माहिती देखील मिळवता येणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून जीआयएसएटी-1 (GISAT-1) हे उपग्रह अंतराळात पाठवलं जाणार आहे. यामुळे सीमा संरक्षण क्षेत्राला मोठी मदत होणार आहे. कारण या उपग्रहाच्या माध्यमातून सीमेवरच्या प्रत्येक घडामोडीवर रियल टाइम लक्ष ठेवता येणार आहे.

बंगळुरूस्थित भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या (ISRO) एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितलं की “आम्ही हे जिओ इमेजिंग उपग्रह 28 मार्च रोजी हवामानाच्या विशिष्ठ परिस्थितीच्या आधारावर प्रक्षेपित करणार आहोत. या उपग्रहामुळे चीन आणि पाकिस्तानवर वचक ठेवता येणार आहे.

हा उपग्रह भारतासाठी गेम चेंजर ठरेल

अंतराळ विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "ही मोहिम एका अर्थाने भारतासाठी गेम चेंजर ठरणार आहे."  कारण या उपग्राहाल हाय रिझोल्यूशनचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परिणामी या उपग्रहाद्वारे भारतीय सीमांवर आणि समुद्री सीमांवर निरंतर नजर ठेवू शकणार आहोत." या मोहिमेच्या उद्दीष्टांची माहिती देताना इस्त्रोने यापूर्वी सांगितलं होतं की, या उपग्रहाच्या मदतीने आपल्याला हवं तेव्हा, हव्या त्या मोठ्या क्षेत्राचं रियल टाइम फोटो मिळवू शकतो.

हे ही वाचा- भारतीय सेनेची ताकद वाढणार; शत्रूवर नजर ठेवणार ISRO चं सॅटेलाइट

नैसर्गिक आपत्ती आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन घटनांवर त्वरित देखरेख करण्यासाठी हे उपग्रह मदत करेल. या उपग्रहाचं तिसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे, शेती, वनीकरण, खनिजशास्त्र, आपत्ती इशारा, ढगांची स्थिती, हिमनदी आणि समुद्रातील स्थिती या सर्वांची माहिती मिळवता येणार आहे. इस्रोनं सांगितलं की, भारतीय उपखंडातील कोणत्याही ठिकाणाच्या रियल टाइम हालचाली नोंदण्यासाठी  जीआयएसएटी-1 या उपग्रहाची मदत होणार आहे.

First published:

Tags: Isro, Satellite