नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : शत्रूवर नजर ठेवण्यासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) पुढील महिन्यात सॅटेलाईट ‘EOS-01’(अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट) लाँच करणार आहे. हे सॅटेलाइट PSLV-C49 रॉकेटमधून (Rocket) लाँच केलं जाणार आहे. इस्त्रोचे वैज्ञानिक, सॅटेलाइट ‘EOS-01’ 7 नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरहून दुपारी 3.02 वाजता लाँच करणार आहेत. ISRO कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट ‘EOS-01’सह 9 कस्टमर सॅटेलाइटही लाँच करण्याची तयारी आहे. हे सर्व सॅटेलाइट न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसह एका कमर्शियल ऍग्रीमेंटअतंर्गत लाँच केले जातील. सॅटेलाइट ‘EOS-01’,ही अर्थ ऑब्जर्वेशन रिसेट सॅटेलाइटची एक ऍडव्हान्स सीरीज आहे. या सॅटेलाइटच्या मदतीने कोणत्याही हवामानात, ढगांमधूनही पृथ्वीवर नजर ठेवता येणार आहे.
#ISRO #PSLVC49 set to launch #EOS01 and 9 Customer Satellites from Satish Dhawan Space Centre in Sriharikota at 1502 Hrs IST on Nov 7, 2020, subject to weather conditions.
— ISRO (@isro) October 28, 2020
For details visit: https://t.co/0zULuciUep pic.twitter.com/VFPxWNdPKe
या उपग्रहामुळे भारतीय सेना, शत्रूवर सहजपणे लक्ष ठेऊ शकणार आहे. चीनकडून गेल्या काही महिन्यांपासून ज्याप्रमाणे लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे, ती पहाता, या उपग्रहाद्वारे लडाख हद्दीवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीसारख्या घटनांवरही लक्ष ठेवता येणार आहे. या सॅटेलाइटचा वापर शेती, फॉरेस्ट्री आणि पूरपरिस्थितीत निरिक्षण करण्यासाठी सिव्हिल ऍप्लिकेशन म्हणूनही केला जाऊ शकतो.