मुंबई, 29 ऑक्टोबर : आयपीएल 2020 मध्ये कोहलीच्या RCB विरुद्ध सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) झुंजार खेळी केली. त्याच्या या इनिंगच्या आदल्या दिवशी भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आला होता. सूर्यकुमारला या संघात स्थान न मिळाल्याने सर्वच स्तरातून निवड समितीवर टीका होत आहे. दरम्यान आता सूर्यकुमारच्या ही कारकिर्द एका वेगळ्या वळणावर आली आहे, कारण न्यूझीलंडचा (New Zealand) माजी ऑल राऊंडर स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याने असा सवाल उपस्थित केला आहे की, सूर्यकुमार वेगळ्या आंतराराष्ट्रीय संघाकडून खेळू इच्छितो का? सूर्यकुमारने बुधवारी मुंबईसाठी अवघ्या 43 बॉल्समध्ये 79 रन्सची धमाकेदार खेळी केली. आरसीबीने दिलेले 165 धावांचे लक्ष्य सूर्यकुमारच्या या खेळीमुळे सहज साध्य करता आले. यामुळे मुंबई इंडियन्सने 5 विकेट्स राखून सामना आपल्या खिशात घातला. याच विजयानंतर स्कॉटने सूर्याबाबत अशी प्रतिक्रिया दिली आहे. स्कॉटची सूर्यकुमारला अशी ‘ऑफर’ मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (MI vs RCB) हा सामना झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी सूर्यकुमारचे कौतुक करणारे ट्वीट्स केले आहेत. स्कॉट स्टायरिसने देखील गमतीशीर ट्वीट केलंआहे आणि त्याने सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून खेळायची इच्छा आहे का असं विचारलं आहे. स्कॉटने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘मला आश्चर्य वाटतं आहे की जर सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची इच्छा असेल तर तो परेशात येऊ शकतो.’
I wonder if Suryakumar Yadav fancies playing International cricket he might move overseas #CoughNZCough
— Scott Styris (@scottbstyris) October 28, 2020
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवची निवड न होणं हे त्याच्यासाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक होतं. कारण गेल्या 2-3 वर्षात सूर्यकुमार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल तसंच देशांतर्गत सामन्यात त्याने उत्तम खेळी केली आहे. त्यामुळे निवड समितीने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का डावललं असा सवाल उपस्थित केला जात आहे.