मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अनुष्का शर्मासमोरच जेव्हा विराट कोहली मरण्याचा अभिनय करतो...

अनुष्का शर्मासमोरच जेव्हा विराट कोहली मरण्याचा अभिनय करतो...

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघाची रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची सुरुवात अत्यंत वाईट झाली. आतापर्यंतच्या १० सामन्यांपैकी त्यांनी फक्त तीन सामनेच जिंकले.

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघाची रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची सुरुवात अत्यंत वाईट झाली. आतापर्यंतच्या १० सामन्यांपैकी त्यांनी फक्त तीन सामनेच जिंकले.

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघाची रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची सुरुवात अत्यंत वाईट झाली. आतापर्यंतच्या १० सामन्यांपैकी त्यांनी फक्त तीन सामनेच जिंकले.

    मुंबई, २५ एप्रिल- बॉलीवूड की क्रिकेट असा प्रश्न लोकांना विचारला तर ते एकच उत्तर देऊ शकत नाहीत. या दोन्ही गोष्टी भारतीयांच्या फार जिव्हाळ्याच्या आहेत. पण याच गोष्टी एकत्र मिळाल्या तर.. बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातलं स्टार कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. चाहत्यांसाठी दोघंही सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. सध्या अनुष्का आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानाबाहेर विराटला चिअर करताना दिसते. याचेच अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

    बॉलिवूडमध्ये आली ‘एक खांद्याच्या ड्रेस’ची फॅशन, काहीसा हटके आहे ट्रेंड

    नुकताच असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोघं वर्च्युअल रिअलिटी शुटिंग गेम खेळताना दिसत आहेत. अनुष्काच्या हातात बंदूक आहे तर विराट तिच्यासमोर मरण्याचा अभिनय करताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडीओ फार क्युट असून सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

    ‘दबंग’गिरी भोवली, सलमान खानविरोधात तक्रार दाखल

    अनुष्का आर्मी या इन्स्टाग्रामच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. रविवारी सामना जिंकल्यानंतर अनुष्का आणि विराटने आपल्या टीमसोबत गेमिंग पार्लरमध्ये धम्माल मस्ती केली. यावेळी गेमिंग पार्लरमध्ये जातानाचा विरुष्काचा व्हिडीओही व्हायरल झाला. दोघांना कडक बंदोबस्तात बॉडीगार्ड कसे घेऊन जातायेत ते यात दिसतंय.

    भावाच्या लग्नासाठी भारतात आले प्रियांका- निक, मंगळसूत्र फ्लाँट करताना दिसली

    आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघाची रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची सुरुवात अत्यंत वाईट झाली. आतापर्यंतच्या १० सामन्यांपैकी त्यांनी फक्त तीन सामनेच जिंकले. अंकतालिकेत हा संघ सर्वात खाली आठव्या स्थानावर आहे. संघात डेल स्टेन आल्यानंतर संघात नवी उमेद जागी झाली. आरसीबीच्या विजयानंतर विराटही सध्या आनंदात दिसतो.

    VIDEO: उर्मिला मातोंडकर यांचा उत्तर मुंबईत कसा सुरू आहे प्रचार?

    First published:
    top videos

      Tags: Anushka sharma, Ipl 2019, Virat kohli, Virushka