Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्ड विरोधात मुंबईच्या डी.एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2/ 7


बुधवारी संध्याकाळी सलमान खान आणि त्याचे काही बॉडीगार्ड डी.एन. नगर परिसरात सायकल चालवत होते. आता सलमान रस्त्यावर सायकल चालवणार म्हटल्यावर त्याला पाहायला गर्दी तर होणारच ना..
3/ 7


सलमान सायकल चालवतोय हे पाहून एका व्यक्तिने त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. ती व्यक्ती गाडीतून सलमानच्या सायकलचा पाठलाग करत होती.
5/ 7


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २० मिनिटं ती अज्ञात व्यक्ती सलमानचा पाठलाग करत होती. भाईजानच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली त्याने आपला राग व्यक्त केला.
6/ 7


सलमान त्या गाडीजवळ गेला आणि त्याने त्या व्यक्तीचा मोबाइल हिसकावून घेतला. यावेळी त्या व्यक्तीची आणि सलमानच्या बॉडीगार्डमध्ये बाचाबाचीही झाली.