COVID-19:स्पायडर मॅन, सुपरमॅनने केल्या गाड्या सॅनिटाइझ तर बॅटमॅनने वाटले मास्क, पाहा PHOTOS

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत जनजागृती करण्यासाठी विविध देशांनी विविध मार्ग अवलंबले आहेत. इंडोनेशियामधील अनेक भागात सुपरहिरोंच्या वेशात कोरोना फायटर्स कोरोनाबाबत जागृती करत आहेत.

  • Share this:

कोव्हिड-19 बाबत जनजागृती करणारे कर्मचारी सुपरहिरोंच्या वेशात त्याचं काम करत आहेत. इंडोनेशियातील Pekanbaru, Riau Province याठिकाणच्या सुपर मार्केटमधलं हे दृश्य आहे. (सौजन्य- Reuters)

इंडोनेशियामध्ये पोलिस देखील सुपरहिरोंची वेशभुषा करत कोरोनाबाबत जागृती करत आहेत. याच वेशात ते त्यांचं कर्तव्य देखील बजावत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलीस रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्या सॅनिटाइझ करताना देखील सुपरहिरोंच्या कपड्यांमध्ये आहेत. इंडोनेशियातील Pasuruan, East Java याठिकाणचे हे फोटो आहेत. (सौजन्य- AP)

ब्राझिलमध्ये देखील कॅप्टन अमेरिका आणि स्पायडर मॅनच्या वेशभुषेत काहीजण कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसले. त्यांनी घरी राहण्याचा संदेश त्यांच्या फोटोतून दिला आहे. (सौजन्य- Reuters)

इंडोनेशियातील Makassar, South Sulawesi याठिकाणी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी सुपरहिरोंचे कपडे घालून बॅनर्सच्या माध्यमातून संदेश दिला आहे. (सौजन्य- Reuters)

इंडोनेशियामध्ये या सुपरहिरोंकडून मास्कचं देखील वाटप करण्यात आलं. (सौजन्य- Reuters)

Pekanbaru, Riau Province या इंडोनेशियातील ठिकाणी देखील सुपरहिरोनी कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी बॅनर्सचा वापर केला. या सर्व उपक्रमांमुळे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे, जेणेकरून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन त्यांच्याकडून केलं जाईल. (सौजन्य- Reuters)

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 25, 2020, 8:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या