मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /इन्स्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार; बचावासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर!

इन्स्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार; बचावासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर!

सध्या मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचे धोकेही वाढत आहेत

सध्या मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचे धोकेही वाढत आहेत

सध्या मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचे धोकेही वाढत आहेत

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी :  काही चांगले करावे, याकरिता अनेक लोकांसाठी सोशल मीडिया हे एक साधन ठरले आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे लोकांना एकमेकांपासून दूर राहवे लागले, पण त्यांना जोडण्यात सोशल मीडियाने (Social Media) महत्वाची भूमिका बजावली. लाईव्ह परफाॅर्मन्स असेल किंवा कोरोना लसीकरण, अर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात सोशल मीडिया अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

जसेजसे आपण स्मार्टफोनशी घनिष्ट जोडले जात आहोत, त्याच प्रमाण फिशींग अॅटॅक ( Phishing Attack) हा मुद्दा चिंतेचा विषय ठरतो आहे. फिशिंग याचा येथे अर्थ फसवणूक आहे. ही फसवणूक ई-मेलव्दारे (Email) केली जाते. हे ई-मेल एखाद्या नामांकित कंपनीकडून आले आहेत, असे युझरला वाटते. त्यामुळे युझर आपली सर्व वैयक्तिक माहिती या ई-मेलसोबत शेअर करतो, आणि अत्यंत सहजपणे जाळ्य़ात अडकतो. इन्स्टाग्रामवर ज्या व्यक्तींना असे डीएम (Direct Message) आले आणि त्यांनी त्या मेसेजवर क्लिक केले आणि त्यांची फसवणूक झाल्याचे पाहायला मिळाले.

हे मेसेज इन्स्टाग्रामकडून (Instagram) आधिकृत येणाऱ्या मेसेजप्रमाणे होते. त्यामुळे हे मेसेज खरे आहेत, असे समजून युझरने त्याला रिप्लाय देताच, त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नियंत्रण संपुष्टात येते. हा अनुभव निश्चितच तणाव वाढवणारा ठरतो.

त्यामुळे युझर्सने हे जाणून घेणे आवश्यक आहे की इन्स्टाग्राम आपल्या युझर्सशी डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून कधीही संपर्क साधत नाही. इन्स्टाग्राम हा नेहमी ई-मेलच्या माध्यमातून युझर्सशी संपर्क साधतो. याची खात्री अॅपमध्ये जाऊन ( सेटिंग्ज-सिक्योरिटी- इन्स्टाग्रामकडून आलेला मेसेज) केली जाऊ शकते. असे आहेत चांगल्या, सुरक्षित पध्दतीने इन्स्टाग्राम अकाऊंट सिक्योर करण्याचे मार्ग...

(हे वाचा-स्टीव्ह जॉब्ज यांचा पहिला जॉब अ‍ॅप्लिकेशन होतोय व्हायरल; लवकरच करणार लिलाव)

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन :  अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी टू फॅक्टर ऑथोंटिकेशन (Two Factor Authentication) सुरु ठेवणे आवश्यक आहे. यामुळे युझरच्या अकाऊंटला दुहेरी सुरक्षितता मिळते. ज्यावेळी कोण्या अन्य व्यक्तीला तुमचा पासवर्ड माहिती असतो, त्यावेळी ही सेटींग फायदेशीर ठरते. यामुळे केवळ युझरच त्याचे अकाऊंट एक्सेस करु शकतो.टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हे थर्ड पार्टी अॅप्लिकेशन असून, ते एसएमएसव्दारे पाठवण्यात आलेल्या कोडव्दारे वापरता येते.

एक चांगला पासवर्ड निवडा :  युझरने आपला पासवर्ड (Password) सहा अक्षरी, क्रमांक आणि सांकेतिक चिन्हांचा वापर करुन तयार करावा.

थर्ड पार्टी अॅप्स : कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्लिकेशनला (Third Party Apps) दिलेला अॅक्सेस युझरने रद्द करणे आवश्यक आहे. हे अॅप्लिकेशन युझरची लाॅगिनविषयक माहिती एक्सपोज करते.

पासवर्ड शेअरिंग :  ज्या व्यक्तींवर तुम्हाला विश्वास नाही, त्यांच्यासोबत अकाऊंटचा पासवर्ड शेअर करु नये.

First published:
top videos

    Tags: Crime news, Entertainment, Instagram, Online fraud, Online security, Social media