Home /News /news /

परदेशात अडकलेले भारतीय लवकरच पोहोचणार मायदेशी, केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

परदेशात अडकलेले भारतीय लवकरच पोहोचणार मायदेशी, केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

विविध कारणास्तव परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे

    नवी दिल्ली, 4 मे : महत्त्वाच्या कारणास्तव परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील लॉकडाऊनमुळे (Lockdown) परदेशात अडकलेल्यांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. प्रवासाची व्यवस्था विमान आणि नौदल जहाजांद्वारे करण्यात येणार असल्याची बाब समोर आली आहे. जगभरात कोरोनाचं (Coronavirus) संकट घोंगावत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्या आहेत. देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. हळूहळू सेवा सुरू केल्या जात आहेत. परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी मानक संचालन पद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे. भारतीय दूतावास आणि उच्चायोग व्यथित भारतीय नागरिकांची यादी तयार करत आहेत. या सुविधेसाठी येणारा खर्च त्या नागरिकांना करावा लागेल. विमान प्रवासासाठी गैर-अनुसूचित व्यावसायिक उड्डाणांची व्यवस्था केली जाईल. 7 मे पासून टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू करण्यात येणार आहे. उड्डाणापूर्वी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. लक्षणे न आढळलेल्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करण्याची परवानगी असेल. वैद्यकीय तपासणीनंतर प्रत्येकाला संबंधित राज्य सरकारद्वारे रुग्णालयात किंवा संस्थात्मक विलगीकरणात 14 दिवसांसाठी स्व-खर्चाने ठेवण्यात येईल. 14 दिवसांनंतर कोविड चाचणी केली जाईल आणि त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. परराष्ट्र आणि नागरी उड्डाण मंत्रालये लवकरच याबाबतची सविस्तर माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहेत. या प्रवासादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. परदेशात गेलेल्या नागरिकांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणण्यात येणार आहे. संबंधित -लॉकडाऊनमध्ये पोलिसचं करीत होता दारूची विक्री, अखेर बिंग फुटलं नागरिकांना रस्त्यावर पाहून मुख्यमंत्री भडकले; 30 मेपर्यंत दिला हा अल्टिमेटम
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या