हरिकांत शर्मा, प्रतिनिधी आग्रा, 19 जून : एका घराच्या बाथरूमच्या सिंकमध्ये साप असल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर वाइल्डलाइफ एसओएस रॅपिड रिस्पॉन्स युनिटने या सापाची सुटका केली. ही घटना नुकतेच आग्राच्या बेलनगंज भागात घडली. बाथरूमच्या सिंकमध्ये साप घुसला होता. हे लक्षात आल्यावर सिंक तोडून त्याला बाहेर काढण्यात आले. नंतर सुटका करण्यात आलेल्या सापाला काही काळ निरीक्षणात ठेवल्यानंतर पुन्हा जंगलात सोडण्यात आले. आग्रामधील बेलनगंज येथील एका घराच्या बाथरूमच्या सिंकमध्ये 2 फूट लांब लांडगा साप लपून बसला होता. कुटुबीयांना साप सिंकमध्ये बसल्याचे पाहताच कुटुंबीयांना धक्काच बसला. कुटुंबीयांनी तत्काळ वन्यजीव एसओएसला माहिती दिली. वन्यजीव विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून 1 तासाच्या प्रयत्नानंतर सुटका केली.
त्याला वाचवणे खूप अवघड होते. कारण साप हाताने बाहेर काढता येणार नाही, अशा पद्धतीने सिंकमध्ये लपला होता. त्यासाठी सिंक तोडावी लागली. तोडतानाही सापाला इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे जवळच सिंक तोडून सापाला बाहेर काढण्यात आले.
भारतीय लांडगा साप विषारी नसतो - सापाची यशस्वीरित्या सुटका केल्यानंतर, वन्यजीव एसओएसच्या पशुवैद्यकांनी सापाची संपूर्ण आरोग्य तपासणी केली. यानंतर सापाला जंगलात सोडण्यात आले. वाइल्डलाइफ एसओएस कॉल करणारे जतिन शर्मा म्हणाले, ‘बाथरुमच्या सिंकमध्ये सापाला पाहून मी खूप घाबरले. मी ताबडतोब मदतीसाठी वन्यजीव SOS शी संपर्क साधला आणि त्यांच्या त्वरित प्रतिसादाबद्दल मी खूप आभारी आहे. सापामुळे कुणाला कोणतीही इजा झाली नाही. इंडियन वुल्फ स्नेक हा भारतीय उपखंडात आढळणारा बिनविषारी साप आहे. हा साप सुमारे 50-70 सेमी लांब असतो आणि त्याच्याभोवती पांढर्या पट्ट्यांसह चमकदार तपकिरी किंवा काळ्या खवले असतात.