Ration Card: रेशनकार्डासंबधित अडचण असल्यास या क्रमांकावर करा तक्रार

Ration Card: रेशनकार्डासंबधित अडचण असल्यास या क्रमांकावर करा तक्रार

रेशन कार्ड हा महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे. याद्वारे नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवलं जातं.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मार्च: रेशन कार्ड (Ration Card) हा महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे. याद्वारे नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण (Food Distribution) यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवलं जातं; मात्र अनेकदा रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येतं. अनेकदा हे धान्य ज्यादा दरानं अन्य दुकानदारांना विकलं जातं. सरकारकडं सातत्यानं याबाबत तक्रारी (Complaints) येत असल्यानं या यंत्रणेतील भ्रष्टाचार,गैरव्यवहार त्या दूर करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत. यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केले असून,यामुळं नागरिक आपल्या तक्रारी अगदी सहजपणे सरकारकडं करू शकतात.

एनएफएसएच्या(NFSA)वेबसाइटवर तक्रार करता येते : नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवर (NFSA) प्रत्येक राज्यासाठी (State) वेगवेगळे टोल फ्री क्रमांक (Toll Free Number) देण्यात आले आहेत. यावर किंवा एनएफएसएच्या वेबसाइटवरhttps://nfsa.gov.inतक्रार करता येईल. या वेबसाइटवर मेल किंवा फोन क्रमांकाच्या आधारे तक्रार नोंदवता येते. प्रत्येक राज्यात रेशन कार्ड बनविण्याची पध्दतही वेगळी आहे. गरीब नागरिकांना अनुदानित (Subsidy) किमतीत धान्य मिळावं,रेशन दुकान व्यवस्थेतील अनागोंदी दूर व्हावी यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. यासाठी हे टोल फ्री क्रमांक महत्त्वाचे ठरणार आहेत.

टोल फ्री क्रमांकाची राज्यनिहाय यादी :

आंध्र प्रदेश - 1800-425-2977

अरुणाचल प्रदेश - 03602244290

आसाम - 1800-345-3611

बिहार- 1800-3456-194

छत्तीसगड- 1800-233-3663

गोवा- 1800-233-0022

गुजरात- 1800-233-5500

हरियाणा - 1800–180–2087

हिमाचल प्रदेश - 1800–180–8026

झारखंड - 1800-345-6598,1800-212-5512

कर्नाटक- 1800-425-9339

केरळ- 1800-425-1550

मध्य प्रदेश- 181

महाराष्ट्र- 1800-22-4950

मणिपूर- 1800-345-3821

मेघालय- 1800-345-3670

मिझोराम- 1860-222-222-789,1800-345-3891

नागालँड- 1800-345-3704,1800-345-3705

ओडिशा - 1800-345-6724 / 6760

पंजाब - 1800-3006-1313

राजस्थान - 1800-180-6127

सिक्किम - 1800-345-3236

तमिळनाडू - 1800-425-5901

(हे पाहा:EPFO चा मोठा निर्णय! नोकरदारांच्या PF वरील व्याजदर निश्चित; पाहा किती बदलला रेट )

तेलंगण - 1800-4250-0333

त्रिपुरा- 1800-345-3665

उत्तर प्रदेश- 1800-180-0150

उत्तराखंड - 1800-180-2000,1800-180-4188

पश्चिम बंगाल - 1800-345-5505

दिल्ली - 1800-110-841

जम्मू - 1800-180-7106

काश्मीर - 1800–180–7011

अंदमान-निकोबार - 1800-343-3197

चंडीगड - 1800–180–2068

दादरा-नगरहवेली-दीव-दमण - 1800-233-4004

लक्षद्वीप - 1800-425-3186

पोंडेचेरी - 1800-425-1082

First published: March 6, 2021, 7:55 AM IST

ताज्या बातम्या