नवी दिल्ली, 04 मार्च : गेले काही दिवस EPFO पीएफवरील व्याजदर (EPFO PF interest rates) कमी करणार असल्याची चर्चा होती. मात्र देशातील तब्बल 6 कोटी नागरिकांना EPFO ने मोठा दिलासा दिला आहे. एपीएफओनं पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात कोणतेही बदल (EPFO fixes PF interest rates) केलेले नाहीत. त्यामुळे या आर्थिक वर्षातही पीएफवरील व्याजदर 8.5 टक्केच राहणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची आज श्रीनगरमध्ये (Srinagar) बैठक झाली. दरवर्षी आर्थिक वर्षासाठी पीएफवरील नव्या व्याजदरांची घोषणा केली जाते. यावर्षी व्याजदर जैसे थेच ठेवण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी मार्चमध्ये व्याजदर घटून 8.5 टक्के करण्यात आलं होतं. 2012-13 या आर्थिक वर्षानंतर 2019-20 आर्थिक वर्षात ठेवण्यात आलेला हा सर्वात कमी व्याजदर होता. तोच या आर्थिक वर्षातही कायम ठेवण्यात आला आहे, असं सूत्रांकडून समजतं आहे. पीटीआयनं याबाबत ट्वीट केलं आहे.
EPFO fixes 8.5 per cent rate of interest on EPF deposits for 2020-21: Sources
— Press Trust of India (@PTI_News) March 4, 2021
देशातील कोरोना संकटामुळे सरकार नोकरदारांना झटका देण्याची शक्यता व्यक्त केली जा होती. सरकारवर पीएफअवरील व्याजदर घटवणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सरकारनं या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत.नोकरदारांसाठी हा मोठा दिलासा आहे.
2020 मध्ये व्याज घटवून देण्यात आलं होतं 7 वर्षातील सर्वात कमी व्याज
मार्च 2020 मध्ये ईपीएफओने आर्थिक वर्ष 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कमी करत 8.5 टक्के केला होता. गेल्या काही वर्षातील हे सर्वात कमी व्याज आहे.
हे वाचा - Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; ही 5 कामं येणं आवश्यक
याआधी 2012-13 मध्ये व्याजदर 8.5 टक्के करण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पीएफ सब्सक्रायबर्सना 8.65 टक्के व्याज मिळत होते, 2016-17 मध्ये हे व्याज 8.65 टक्क्यांनी मिळत होते, 2017-18 आणि 2015-16 साठी व्याजदर 8.8 टक्के होता. 2013-14 साठी पीएफच्या रकमेवरील व्याजदर 8.75 टक्के होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Money, Pf, Pf news, Rate of interest, Srinagar