नवी दिल्ली, 05 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेह दौऱ्यानंतर रविवारी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 11.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात जाऊन ही भेट घेतली. देशासमोर असलेल्या महत्त्वपूर्ण आव्हानांवर 30 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गलवान खोऱ्यात झालेला भारत-चीन संघर्ष आणि त्यामुळे भारत-चीन सीमेवर असलेला तणाव, कोरोना, पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन यासारख्या अनेक राष्ट्रीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Prime Minister @narendramodi called on President Kovind and briefed him on the issues of national and international importance at Rashtrapati Bhavan today. pic.twitter.com/yKBXCnfboE
— President of India (@rashtrapatibhvn) July 5, 2020
हे वाचा- देशात दर तासाला एक हजार रुग्ण, कोरोनाची आतापर्यंत सर्वात धक्कादायक बातमी सध्या भारत-चीनमधील संबंध अत्यंत नाजून वळणावर आहेत. आपल्याला एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील समस्या उभ्या आहेत.आपण आव्हानांनाचा सामना निर्भिडपणे करत आहोत. या काळात आपण एकजुटीनं राहाणं महत्त्वाचं आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्वीट करून नागरिकांना आवाहन केलं आहे.
हे वाचा- फक्त 10 सेकंदात भारताच्या लढाऊ विमानांची धडक, हे PHOTOS पाहून चीनला भरेल धडकी भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखचाा दौरा केला. यावेळी तिथे लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना मोदींनी भारताच्या कणखरतेविषयी थेट शब्दांत संदेश दिला. ‘विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,’ अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला.कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिली होती. चीन आणि भारत यांच्यातील असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर राष्ट्रपतींसोबत चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. भारत चीनच्या दादागिरीला आणि मुजोरीला उत्तर देण्यासाठी सर्वतोपरीनं सज्ज आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगानं हलचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर