

चीन (China) सोबत सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर (India China Border Dispute) लष्कराने (Indian Army) मोठा निर्णय घेतला आहे. चीनच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाने (Indian Air force) लेह-लडाखमध्ये (leh-Ladakh) संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. याच भागात चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने लष्कराने हा निर्णय घेतला आहे.


भारतीय हवाई दलाची सुखोई 30MKI आणि MiG-29 ही लढाऊ विमाने फक्त 10 सेकंदांमध्ये सीमेजवळ धडक देऊ शकतात. चीनच्या सीमेजवळच्या हवाई दलाच्या तळावर लढाऊ विमानांचा हा सराव सुरू आहे.


भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमा वाद ( India China Border Dispute) शांत होण्याची शक्यता दिसत नाही. दोन्ही देशांची सीमा वादावर बोलणी सुरू असतानाच चीनने सीमेवर तब्बल 20 हजार सैनिक (China Army) तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सैनिक सीमेजवळच्या तळांवर असून कमीत कमी वेळात प्रत्यक्ष LAC जवळ जाता येईल अशा परिस्थितीत ते आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. भारताचीही चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर असून लष्करानेही सगळी तयारी केली आहे.


हे सैनिक सीमेजवळच्या तळांवर असून कमीत कमी वेळात प्रत्यक्ष LAC जवळ जाता येईल अशा परिस्थितीत ते आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. भारताचीही चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर असून लष्करानेही सगळी तयारी केली आहे.


भारत आणि चीन यांच्यात 15 ते 16 जून दरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर (Corps Commander Level) चर्चा झाली. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही.


या युद्धाभ्यासात सुखोई 30MKI, चिनूक MI 17, MiG-29 या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यात मालवाहू विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टरही सहभागी झाले होते. या भागातली भौगोलिक परिस्थिती पाहता लष्कराला खास काळजी घ्यावी लागते त्याचाही सराव करणे सुरू आहे.