जीएसटीपाठोपाठ आता आयकरातही मोठे फेरबदल होणार ?

जीएसटीपाठोपाठ आता आयकर वसुलीतही सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आयकर, कॉर्पोरेट टॅक्स सारख्या प्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने अभ्यास समितीची स्थापना केलीय. ही समिती सहा महिन्यात आपला अहवाल सादर करेल.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 08:31 PM IST

जीएसटीपाठोपाठ आता आयकरातही मोठे फेरबदल होणार ?

22 नोव्हेंबर, नवी दिल्ली : जीएसटीपाठोपाठ आता आयकर वसुलीतही सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आयकर, कॉर्पोरेट टॅक्स सारख्या प्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने अभ्यास समितीची स्थापना केलीय. ही समिती सहा महिन्यात आपला अहवाल सादर करेल. प्रत्यक्ष कर समिती अर्थात डीटीसीच्या काही नियमांमध्येही काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत. या नव्या कर सुधारणामुळे करदात्यांमध्ये आयकरात काही प्रमाणात सूटही मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत टॉक्स फोर्सचे सदस्य ?

मुकेश पटेल, टॅक्स गुरू सीनएनबीसी आवाज

अरविंद मोदी, सीए

गिरीष अहुजा, अध्यक्ष, ईएंडवाय

Loading...

मानसी केडिया, निवृत्त आयआरएस

जी. सी. श्रीवास्तव, अर्थ सल्लागार

अरविंद सुब्रमन्यम, अर्थतज्ज्ञ

ही डीटीसी अभ्यास समिती इतर देशांमधील आयकराचा अभ्यास करून त्याधर्तीवर आपल्या देशात नेमक्या कर सुधारणा करता येतील, याचा सविस्तर देणार आहे. या समितीला सहा महिन्यांचा कार्यकाल निश्चित करण्यात आलाय.

आयकरातील या फेरबदलांबाबत खरंतर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतच कर सुधारणा विधेयक आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण केंद्रात सत्ताबदल झाल्याने पुढे हा विषय बारगळला. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मोदी सरकारने आयकरातही सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय.

आपल्या देशात सध्या 1961च्या आयकर कायद्यानुसार करवसुली होते. त्यातल्या बऱ्याच तरतूदी आता कालबाह्य झाल्यात म्हणूनच केंद्र सरकारने आयकरातही मोठे फेरबदल करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 08:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...