देशात Covid-19 रुग्णांनी पार केला मोठा आकडा, वाचा काय आहे राज्यांची स्थिती

देशात Covid-19 रुग्णांनी पार केला मोठा आकडा, वाचा काय आहे राज्यांची स्थिती

गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. या काळात संसर्गाची 1463 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) देशात हाहाकार माजला आहे. या संसर्गजन्य रोगामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. सोमवारी देशात कोव्हिड-19 रुग्णांच्या मृत्यांची संख्या वाढून 886 झाली आणि संक्रमणाची संख्या 28,380 पर्यंत वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry ) म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. या काळात संसर्गाची 1463 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 21,132 लोक अजूनही कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या विखळ्यात आहेत आणि त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या एकूण 6,184 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 22.41 पर्यंत पोहोचली असून त्यापैकी महाराष्ट्रातील 19, गुजरातमधील 18, राजस्थानमधील 8, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2 किंवा एक जण मरण पावलं आहेत.

रात्रभरात 1200 जणांना क्वारंटाईन करणार, IAS अधिकाऱ्यानं उचललं कठोर पाऊल

मृत्यूच्या एकूण 886 घटनांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 369 मृत्यू आहेत. यानंतर गुजरातमध्ये 151, मध्य प्रदेशात 106, दिल्लीत 54, राजस्थानात 41 आणि उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात 31-31 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये 26, तामिळनाडूमध्ये 24, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकात 20 आणि पंजाबमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये 6, केरळमध्ये 4, झारखंड आणि हरियाणामध्ये प्रत्येकी 3, बिहारमधील 2, मेघालय, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि आसाममधील प्रत्येकी एक जण मरण पावलं आहे.

अमेरिकेमध्ये 1 दशलक्ष लोकांना झाला कोरोना संसर्ग

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे व्हाइट हाऊसच्या भीतीपोटी जास्त मृत्यू झाले आहेत. व्हाईट हाऊसने अशी शंका व्यक्त केली होती की, सुमारे 60 हजार लोकांचा मृत्यू होईल. अमेरिकेत, विषाणूच्या संसर्गाची प्रकरणं वाढून 10 लाखापर्यंत गेली आहेत. त्याच वेळी, संसर्गामुळे 55,519 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारपर्यंत कोरोना विषाणूचे एकूण 9 लाख 87 हजार 590 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. शनिवारीच्या तुलनेत संसर्ग होण्याचे प्रमाण 27,446 ने जास्त होतं.

पुणेकरांसाठी खूशखबर! आला नवा आदेश, लॉकडाऊनमध्ये मिळणार ही सूट

संपादन - रेणुका धायबर

First published: April 28, 2020, 7:07 AM IST

ताज्या बातम्या