बरेली, 27 मार्च : नवरा बायकोमधला वाद सगळ्यांनाच माहित आहे. पण कोरोनामुळे जोडप्यात वाद झाला आणि यातून पतीनेआत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भामोरा पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे. भमोरा येथील बिचुरैया गावी राहणारा कुंवर पाल सिंह यांचा मोठा मुलगा रवीसिंग (वय 35) हा मथुरा येथील तेल कंपनीत पेट्रोल पंपांवर फिटर म्हणून काम करतो. दोन दिवसांपूर्वी तो त्याच्या गावी आला होता. मथुराहून परत आल्यावर पत्नीने सांगितले की कोरोनाचा धोका वाढला आहे. म्हणून घरात येण्यापूर्वी कपडे बाहेर काढा. आणि कोणाला हात लावण्याआधी आंघोळ करा. यावरून नवरा-बायकोमध्ये वादा झाला आणि नवरा नाराज झाला. यानंतर रवीसिंग घराच्या काही वस्तू घेण्याच्या बहाण्याने बलिया बाजारात गेला परंतु लॉकडाऊनमुळे त्याला कोणतंही सामान सापडलं नाही. हे वाचा - माझी पत्नी जग सोडून गेली पण तुम्हाला त्रास नको, अंगावर शहारे आणणारा अंत्यसंस्कार शेजार्यांचे म्हणणे आहे की, त्याला दारू पिण्याचा देखील शौक होता. दुकाने बंद पडल्यामुळे त्याला दारूही मिळाली नाही. यावेळी नाराज आणि वैतागलेल्या रवीने बहिणीला फोन केला आणि मला काहीच सामान भेटलं नाही. कोरोनामुळे मला खूप भीती वाटत आहे. माझं मन मला काहीतरी वाईट सांगत आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. यानंतर मंगळवारी रात्री गावाजवळ शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रवीचे दोन वर्षांपूर्वी नीरजशी लग्न झाले होते. ग्रामस्थांनी मृतदेह लटकलेला पाहून त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ज्यावर भामोरा पोलीस पुढील तपास करत आहेत. हे वाचा - नराधमांनी लॉकडाऊनचा घेतला फायदा, विद्यार्थिनीवर 10 जणांनी केला बलात्कार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.