'माझी पत्नी तर जग सोडून गेली पण तुम्हाला त्रास नको' कोरोनामुळे अंगावर शहारे आणणारा अंत्यसंस्कार

'माझी पत्नी तर जग सोडून गेली पण तुम्हाला त्रास नको' कोरोनामुळे अंगावर शहारे आणणारा अंत्यसंस्कार

या आजारामुळे लोकांमध्ये इतकी भीती आहे की काही लोकांनी टोकाचं पाऊल उचललं.

  • Share this:

आग्रा, 27 मार्च : कोरोनाव्हायरस मोठ्या प्रमाणात जगभरात वाढत आहे. या व्हायरसचा फैलाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण तरीदेखील लोक नियमांचं उल्लंघन करून घराबाहेर पडतात. तर या आजारामुळे लोकांमध्ये इतकी भीती आहे की काही लोकांनी टोकाचं पाऊल उचललं. कोरोनाच्या भीतीमुळे पतीने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना घरी पाठल्याचं समोर आलं आहे.

समाजाच्या हितासाठी घेतलेले निर्णय त्यांनी मोडले आणि विनाकारण घराबाहेर पडले त्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे. पत्नी ममता यांच्या अंत्यसंस्काराला लोकांनी गर्दी केली. पण देवकीनंदन त्यागी यांनी लोकांसमोर हात जोडले आणि लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही गर्दी करू नका आणि सगळ्यांनी घरी जा असं सांगितलं. काहीही झालं तरी आपण पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय मोडू शकत नाही असं म्हणत त्यांनी अवघ्या 10 लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.

हे वाचा - देशात कोरोना रुग्णांचा आकडा 724 वर, 66 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आग्रा इथल्या न्यू विजय नगर कॉलनीतील नगला धानी भागात राहणारे देवकीनंदन त्यागी यांची पत्नी ममता यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. हितचिंतक आणि जवळचे नातेवाईकांची गर्दी जमली होती. लॉकडाऊन आणि गर्दी न जमविण्याच्या शासकीय आदेशामुळे गोंधळ उडाला. मोठ्या संख्येने जमा झालेल्यांच्या भावनांमध्ये पोलिसांनाही काही निर्णय घेता आला नाही. दुसरीकडे, कुटुंबातील लोक रडत होते. काय करावं आणि काय करू नये याबद्दल चर्चा सुरू झाल्या. सर्वांनी अंत्ययात्रेमध्ये सामील होण्याचा निर्धार केला. देवकीनंदन यांच्या घराबाहेर गर्दी झाली होती.

ही गर्दी पाहताच देवकीनंदन बाहेर आले आणि त्यांनी या प्रसंगी जमलेल्या लोकांना स्पष्टपणे सांगितले की ममता आता परत येऊ शकणार नाहीत. परंतु थोडीसा निष्काळजीपणा झाल्यास समाजातील इतर लोक अडचणीत येऊ शकतात. त्यांनी या प्रसंगी आलेल्या लोकांना विनंती केली की त्यांनी प्रत्येकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत पण लोकांचे आयुष्य संकटात पडू नये हे चांगले. त्यामुळे सगळ्यांनी घरी जा आम्ही 10 लोकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करू असं आवाहन त्यांनी लोकांना केलं.

हे वाचा - नराधमांनी लॉकडाऊनचा घेतला फायदा, विद्यार्थिनीवर 10 जणांनी केला बलात्कार

आईसाठी व्हायचं होतं वकील

देवकीनंदन हे सध्या मोठ्या संकटात आहेत. त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला असताना असा कठोर निर्णय घेणं हे कौतूकास्पद आहे. देवकीनंदन यांना तीन मुले आहेत. दोन मुलगे एक मुलगी. त्यांची पत्नी ममता यांनी असा आग्रह धरला की मुलगी अंजली चांगल्या महाविद्यालयात शिकून वकील व्हावी. मुलगीसुद्धा आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यास तयार होती. तसेच बेंगळुरूच्या एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. 20 मार्च रोजी अंजली आग्राला परतली. ती रडत होती आणि म्हणत होती की आई मला एक वकील म्हणून पाहू शकेल अशी माझी इच्छा होती.

लॉकडाऊनमुळे मुलगा येऊ शकला नाही

देवकीनंदन यांचा मोठा मुलगा दीपक लॉकडाऊनमुळे येऊ शकला नाही. तो मर्चंट नेव्हीमध्ये तैनात आहे. सध्या दुबईमध्ये नियुक्ती आहे. निर्बंधांमुळे दीपक तेथून बाहेर पडू शकला नाही. व्हिडिओ कॉलद्वारे त्याला त्याच्या आईचे अंतिम दर्शन देण्यात आले. हे दृश्य पाहून घटनास्थळावर उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आलं.

हे वाचा - येत्या 12 तासांत हवामान मोठा बदल, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

First published: March 27, 2020, 10:38 AM IST

ताज्या बातम्या